Full Width(True/False)

कंगना आणि हृतिक यांच्यातील ई-मेल प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मुंबई:अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यांच्यातील ईमेल वादाप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांकडे असलेला तपास टीआरपी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक अर्थात सीआययूकडे देण्यात आला आहे. २०१६मधील याप्रकरणी पुढे काहीच तपास होत नसल्याची तक्रार हृतिकचे वकील महेश जेठमलानी यांनी पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काय आहे नेमका हा वाद?हृतिकने आपल्याला काही खासगी आणि रोमॅन्टिक ई-मेल पाठवल्याचा आरोप कंगनाने केल्याने वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर हृतिकने सर्व आरोप फेटाळत कंगनाला आव्हान दिले होते. या दोघांमधील वाद मग पोलिसांपर्यंत गेला. उलट कंगनानेच मला हजारो मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून २०१६ मध्ये वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाचा: कंगनाने मात्र याबाबत आपणांस काही माहित नसून बोगस आयडीवरून पाठविण्यात आले असावेत, असे म्हटले होते. तपासाकरिता ह्रतिकने मोबाइल, लॅपटॉप तसेच इतर साहित्य पोलिसांना दिले होते. चार वर्षांनंतरही या गुन्ह्याचा तपास जैसे थेच आहे. न्यायालयाने मोबाइल, लॅपटॉप तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले होते. मात्र तपास सुरू असल्याने ह्रतिकने ते घेतले नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या गुन्ह्यांच्या तपासामध्ये लक्ष देऊन तो लवकरात लवकर संपवावा, अशी मागणी महेश जेठमलानी यांनी पत्राद्वारे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली. हे पत्र मिळताच आयुक्तांनी याप्रकरणाचा पुढील तपास सीआययूकडे सोपविला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aiU4Oq