नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया कंपनीचे तुम्ही जर ग्राहक असाल तसेच प्रीपेड प्लानचा वापर करीत असाल तर या प्लान मध्ये ५६ दिवसांची वैधता असलेल्या प्लानसंबंधी आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत. या कंपन्यांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळत असून याची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः Jioचा ३९९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा ५६ दिवसांची वैधता असलेला प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. ऑन नेट फ्री कॉलिंगसाठी २ हजार मिनिट्स आणि रोज 100SMS तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः Airtelचा ३९९ रुपयांचा प्लान एअरटेल कंपनीच्या या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. तसेच या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि रोज 100SMS तसेच एअरटेल एक्सट्रिम सर्विस आणि विंक म्यूझिकचे अॅक्सेस दिले जाते. या प्लानमध्ये फ्री हेलोट्यून्स फास्टॅग खरेदी वर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि फ्री ऑनलाइन कोर्सेस ऑफर केला जातो. वाचाः एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्लान एअरटेलाच ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये फ्री कॉलिंग, रोज १०० एसएमएस, फ्री हेलोट्यून्स, एअरटेल एक्सट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे अॅक्सेस तसेच एक वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्सेस ऑफर केला जातो. वाचाः Vi (Vodafone Idea)चा ३९९ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. तसेच ५ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. विकेंड डेटा रोलओवर, कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग, रोज १०० एसएमएस तसेच वोडाफोन-आयडिया मूव्हिज अँड टीव्हीचे अॅक्सेस दिले जाते. ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा ५६ दिवसांची वैधता मिळते. रोज ४ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग, विकेंड डेटा रोलओवर आणि Vi मूव्हिज अँड TVचे अॅक्सेस मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34XPZLY