Full Width(True/False)

प्रेग्नंट आहे नेहा कक्कर, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो

मुंबई- बॉलिवूड गायिका नेहा कक्करने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. नेहा लवकरच आई होणार आहे. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहनप्रीत सिंगसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला. यात ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटोमध्ये नेहाने निळ्या रंगाची डेनिमची डंगरी घातलेली दिसत आहे. नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, '#KhyalRakhyaKar.' नेहाच्या चाहत्यांना तिच्या गरोदर असण्यावर विश्वास बसत नाहीए. अनेक यूझर्सनी ती गरोदर असण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेहा कक्करने दोन महिन्यांपूर्वी रोहनप्रीतशी लग्न केलं. अशात फक्त तिच्या चाहत्यांसाठीच नाही तर सर्वांसाठीच ही बातमी थोडी धक्कादायक आहे. नेहाने २४ ऑक्टोबरला रोहनप्रीतशी लग्न केलं. नेहाने रोहनप्रीतसोबतच्या प्रेमाचा स्वीकार ते लग्नाचा निर्णय या सर्वाची घोषणा सोशल मीडियावरच केली होती. रोहनप्रीत आणि ती नात्यात असण्यालं जेव्हा नेहाने सांगितलं त्याच्या काही दिवसांनंतरच नेहाने लग्नही केलं. नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघंही हनीमूनसाठी दुबईला गेले होते. दुबईवरूनही दोघांनी चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. नेहा कक्करच्या रिलेशनशिपपासून ते लग्नापर्यंत आणि हनीमूनपर्यंत साऱ्याच गोष्टींची चर्चा झाली. आता तिची गरोदर असण्याची बातमीही बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mzwxep