Full Width(True/False)

कंगनाने पुन्हा काढली दिलजीत दोसांजची कळ, अभिनेत्याने दिलं उत्तर

मुंबई- शुक्रवारी हिने तिच्या ट्विटर अकाउंटवरून पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा आणि यांच्यावर निशाणा साधला होता. दोघांनीही शेतकरी आंदोलनाना समर्थन दिलं होतं आणि त्यासंबंधीचे अनेक ट्वीटही केले होते. यानंतर कंगनाने आता काही ट्वीट केले आहेत. यात तिने थेट दिलजीतलाच टॅग करत हॅशटॅगमध्ये दिलजीत कित्थे आ (दिलजीत कुठे आहे?) असा प्रश्नही विचारला आहे. दिलजीतनेही त्याच्याच शैलीत कंगनाला मजेशीर प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनाने विचारलं दिलजीत कित्थे आ.. कंगनाने लिहिले की, हैदराबादमध्ये १२ तासांची शिफ्ट संपल्यानंतर आज संध्याकाळी मी चैन्नईमध्ये एका चॅरिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली होती. मी पिवळ्या रंगात कशी दिसत आहे? यासोबतच दिलजीत कित्थे आ ? प्रत्येकजण त्याला ट्विटरवर शोधत आहे. कंगनाने स्वत: ला म्हटलं, सर्वांची आई दुसर्‍या ट्विटमध्ये तिने लिहिले की, मी पुन्हा सांगत आहे की मी बरोबर आहे, जर हे प्रकरण न्यायालयात गेलं असतं तर मी जिंकले असते. म्हणून चिल्लर पार्टी पुढच्यावेळी मला त्रास देण्यापूर्वी, शिवीगाळ करण्यापूर्वी आणि माझी थट्टा उडवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की मी तुम्हा सर्वांची आई आहे. #दिलजीत_कित्थे_आ दिलजीतने दिलं मजेदार उत्तर कंगनाच्या ट्वीटनंतर प्रत्येकजण दिलजीतच्या उत्तराची वाट पाहत होता. त्याने उशीराने उत्तर दिलं. पण असं काही उत्तर दिलं की कंगना गप्प झाली. दिलजीतने लिहिले की, सकाळी उठून व्यायाम केला.. मग दिवसभर काम केलं, आता मी झोपायला जात आहे, हे घे माझं वेळापत्रक वाच. हॅशटॅग देताना त्याने लिहिले की, #माझं_वेळापत्रक.. ये.. ये..


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Wb4JCB