मुंबई: इतर मालिकांपेक्षा वेगळ्या असतात. पडद्यावरचे दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी अत्यंत नेमकेपणाने सर्व काही करण्याचा निर्माते आणि दिग्दर्शकांचा प्रयत्न असतो. छोट्या पडद्यावरच्या '' या आगामी मालिकेच्या सेटचीही सध्या चर्चा सुरू आहे. या मालिकेत इतिहासातील महत्त्वाच्या घटना दाखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा मांडली आहे. या मालिकेसाठी तब्बल सहा महिन्यांपासून संशोधन सुरू होतं तर सहा महिने सेटच्या निर्मितीसाठी लागले आहेत. या सेटचं डिझाइन तयार करताना, कला दिग्दर्शकांनी सेट डिझाइन करतानाच इतर घटकांची, जसं की, पोशाख, प्रकाश आणि अगदी प्रॉपचा देखील कसून विचार केला आहे, जेणे करून १८व्या शतकाचा काळ हुबेहूब प्रेक्षकांना पाहाता येईल. सेट उभारण्याच्या प्रेक्रियेबद्दल बोलताना कला दिग्दर्शक म्हणाले, 'हा सेट तयार करताना आमची प्रेरणा होती, १५ व्या ते १८ व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृती. मी यापूर्वी काही पौराणिक मालिकांसाठी काम केलेलं आहे पण ही माझी पहिलीच ऐतिहासिक मालिका आहे, आणि मी म्हणेन की, हा अगदीच वेगळा अनुभव आहे. पौराणिक मालिकांमध्ये कलात्मक स्वातंत्र्य घेता येते, पण इथं मात्र जास्तत जास्त अचूक आणि नेमके असण्यावर आमचा भर असतो कारण त्याची सहज तुलना केली जाते. सेट डिझाइन अस्सल दिसण्यासाठी आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पार्श्वभूमीसाठी पडदे आणि महालतील इतर फर्निचरसाठी अस्सल आणि उच्च दर्जाचे महेश्वरी वस्त्र वापरले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34Rm4VF