Full Width(True/False)

झेडपीचे 'ग्लोबल' डिसले गुरुजी kaun banega crorepatiच्या मंचावर

मुंबई: ‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘’ ()या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले लवकरच टीव्हीवरील या शोमध्ये दिसणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’या शोचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. आगामी एका खास भागात रणजितसिंह डिसले हे सहभागी होणार असून त्यांच्यासोबत राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या उषा खरे देखील दिसणार आहेत. रणजितसिंह डिसले आणि उषा खरे यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी दोघांना या शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे.'जेव्हा एक मुलगी शिकते त्यावेळी फक्त दोन घरं बदलत नाहीत तर त्यांचा आसपासची घरं देखील बदलतात', असं उषा खरे यांनी म्हटलं तर शिक्षणात तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं रणजितसिंह डिसले यांनी सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2KciDlv