Full Width(True/False)

कर्तव्यात केला हलगर्जीपणा, NCB ने केलं दोन अधिकाऱ्यांना निलंबित!

मुंबई- ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने () आपला तपास सुरू केला आहे. आता याच प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. हे दोन अधिकारी दीपिका पादुकोणची मॅनेजर आणि आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या प्रकरणाचं काम हाताळत होते. या दोन्ही प्रकरणात न्यायालयाच्या कामात हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप दोन्ही अधिकाऱ्यांवर आहे. सुनावणीच्या वेळी अधिकारी न्यायालयात हजर नव्हते महत्त्वाचं म्हणजे भारती सिंगच्या प्रकरणात, मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी कोर्टाने २३ नोव्हेंबर रोजी नवरा- बायकोला सूट दिली होती. भारती आणि हर्ष यांच्या घरी फार कमी प्रमाणात ड्रग्ज मिळाल्याचं कारण देऊन त्यांना सूट देण्यात आली होती. दरम्यान, या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षाची शिक्षा आहे. भारतीच्या घरातून एनसीबीला ८६.५ ग्रॅम गांजा सापडला होता. भारतीच्या जामिनाच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात खटल्याचा तपास करणारे दोन्ही अधिकारी आणि सरकारी वकील अतुल सरपांडे हजर नव्हते. कर्तव्यामध्ये हलगर्जीपणाचा आरोप करिश्मा प्रकाशच्या बाबतीत एनसीबी अधिकाऱ्याची वागणुक फारशी चांगली नव्हती. या छाप्यात करिश्मा प्रकाशच्या घरातून १.७ ग्रॅम चरस जप्त करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही निलंबित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नाहीत. पण त्यांच्यावर कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप आहे. दरम्यान, भारतीच्या जामिनानंतर २६ नोव्हेंबर रोजी एनसीबीने जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची केली चौकशी एनसीबी एकाच वेळी ड्रग्ज संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी करत आहे. या प्रकरणांमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी आणि ड्रग पेडलर्स यांचा समावेश आहे. एनसीबीने या प्रकरणात दोन डझनहून अधिक लोकांना अटक केली असून अनेक नामांकित व्यक्तिंची चौकशीदेखील केली आहे. यात दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग, अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37yfvIr