Full Width(True/False)

स्मार्ट फीचर्स सोबत लाँच झाला Nokia चा एसी, २९ डिसेंबर पासून विक्री

नवी दिल्लीः स्मार्टफोन लाँच करणाऱ्या Nokia ने भारतात आपल्या प्रोडक्ट्सची रेंज वाढवत आता (AC) ला लाँच केले आहे. नोकियाचा एयर कंडिशनर्स इनव्हर्टर टेक्नोलॉजी आणि मोशन सेन्सर्स यासारखे फीचर्स दिले आहेत. भारतात याची सुरुवातीची किंमत ३० हजार ९९९ रुपये आहे. नोकियाचा एसी २९ डिसेंबर पासून फ्लिपकार्टवरून विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. वाचाः भारतात बनवली डिझाईन नोकियाच्या एसीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची डिझाईन भारतात केली असून तो भारतात बनवण्यात आला आहे. या एसीमध्ये सेल्फ क्लिनिंग टेक्नोलॉजी सोबत फोर इन वन अजस्टेबल इनवर्टर मोड दिले आहे. हे एयर कंडिशनर ड्यूल रोटरी कंप्रेसर आणि विना ब्रशचे डीसी मोटर दिले आहे. वाचाः स्मार्ट फीचर्स सोबत नोकियाचा एसी नोकियाच्या एसी मध्ये नेगेटिव आयोनाइजर सोबत सिक्स इन वन एयर फिल्टर सुद्धा मिळणार आहे. या फीचर्स सोबत यात अनेक स्मार्ट फीचर्स दिले आहेत. नोकियाच्या या एसीत कस्टमाइज्ड युजर प्रोफाइल आणि मल्टीपल शेड्यूलर सारखे स्मार्ट फीचर्स दिले आहेत. या एयर कंडिशनर्स मध्ये रॅपिड कूलिंग फीचर सोबत कंपनीने अँटी कोरोसिव इंटरनल्स दिले आहे. वाचाः स्मार्टफोनने करा कंट्रोल या एयर कंडिशनर्स ला तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने कंट्रोल करू शकता. याशिवाय एसीला मेनटेन ठेवण्यासाठी वेळोवेळी क्लिनर रिमाइंडर आणि स्मार्ट डायग्नोसिस सारखे नोटिफिकेशन्स सुद्धा मिळतील. फ्लिपकार्टचा दावा आहे की, नोकिया एयर कंडीशनर्सला खास भारतीय युजर्संना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hbr2Ss