मुंबई- '' चे स्पर्धक जवळपास १०० दिवस घरात बंद आहेत. त्यांचा बाहेरील जगाशी काही संबंध नाही. ते त्यांच्या कुटुंबियांनाही गेल्या १०० दिवसांपासून भेटले नाहीत. पण अलीकडेच बिग बॉसने सर्व स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी भेटण्याची एक संधी दिली. या अचानक मिळालेल्या संधीमुळे प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळत होते. पण एकट्या राखीच्या घरून तिला कोणीही भेटायला आलं नाही. त्यामुळे तिच्यासाठी हे थोडसं दुःखद होतं. जेव्हा राखीने सर्व स्पर्धकांचे घरातले त्यांना भेटायला येत असल्याचं पाहिलं तेव्हा ती वॉशरूममध्ये जाऊन रडू लागली. तिथे उभ्या असलेल्या रुबीना दिलैकला ती म्हणाली की, 'माझे वडील नाहीत. आई आजारी आहे आणि घरातल्या इतरांशी एवढं बोलणं होत नाही. म्हणून मी माझा वेळ तुला देते. आपल्या कुटुंबियांना भेट.' प्रत्येकजण राखीच्या या औदार्याचं कौतुक करतात आणि तिला गोल्डन हार्ट असणारी व्यक्ती म्हणत आहे. राखीच्या या प्रेमळ स्वभावामुळे रुबीनाही भावुक होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35Atc9F