Full Width(True/False)

सावधान! रितेश देशमुखचं संपूर्ण बँक अकाउंट होणार होतं रिकामी

मुंबई- सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्यातही इन्स्टाग्रामवर तो चाहत्यांसाठी नवनवीन गोष्टी सातत्याने शेअर करत असतो. इन्स्टावर त्याचं फॅन फॉलोइंगही चांगलं आहे. नुकताच त्याने महाराष्ट्र सायबर विभागाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो चाहत्यांना नवीन प्रकारच्या सायबर क्राईमबद्दल माहिती करून देताना दिसत आहे. रितेशला या सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याने ट्विटरवर यासंबंधीचा स्क्रीनशॉट शेअर केला. सावधगिरी बाळगा, अशा लिंकवर क्लिक करू नका या व्हिडिओमध्ये नमूद केल्यानुसार, या प्रकाराचं नाव आहे कॉपीराइट फिशिंग घोटाळा. याअंतर्गत, यूझरना फिशिंग वेबसाइटवरून मेसेज येतो की त्यांनी इन्स्टाग्रामच्या कॉपीराइट धोरणांचं उल्लंघन केलं आहे. तसंच दिलेल्या लिंकवर अभिप्राय न दिल्यास त्यांचं अकाउंट २४ तासात बंद केलं जाईल. या लिंकवर क्लिक करून यूझरचा डेटा चोरला जाऊ शकतो. एवढंच नाही तर त्यांची सर्व माहिती घेऊन बँक खाती रिकामी केली जातात. अशा मेसेजपासून सावध राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केलं आहे. रितेशने मेसेजचा स्क्रीनशॉट केला शेअर रितेश देशमुख यालाही याच पद्धतीचा एक मेसेज गेला. या मेसेजचा स्क्रीनशॉट त्याने महाराष्ट्र पोलिसांच्या व्हिडिओसह सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा मेसेज इन्स्टाग्राम सपोर्टच्या वेरिफाइड अकाउंटचा असल्यासारखा दिसतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hYFddW