Full Width(True/False)

दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर कंगनाने मागितलं दिलजीतकडे उत्तर

नवी दिल्ली- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड झाली. यावेळी शेतकरी लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले आणि त्या जमावाने खालसा पंथ साहिबचा धार्मिक ध्वजही तिथे लावला. या हिंसाचाराचा बॉलिवूड सेलिब्रिटींनी समाचार घेतला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया यावर दिल्या. सर्वातआधी अभिनेत्री कंगना रणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील हिंसाचाराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले. कंगनाने तिचा एक व्हिडीओ शेअर करत हिंसाचार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. दुसऱ्या ट्वीटमध्ये कंगनाने शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीबद्दल आणि प्रियांका चोप्रा यांनाही प्रश्न विचारले आहेत. त्याचं झालं असं की, दिलजीत आणि प्रियांका या दोघांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. कंगनाने एक फोटो शेअर करत म्हटलं की, 'दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रा तुम्ही यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आज संपूर्ण जग आपल्यावर हसत आहे. तुम्हाला हेच हवं होतं ना.. अभिनंदन.' शेतकरी आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देणारी अभिनेत्रा स्वरा भास्करनेही लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवण्यावर टीका केली आहे. तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत कोणत्याही धर्माचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवणं योग्य नसल्याचं ती म्हणाली. शेतकऱ्यांना समर्थन देणारी आणखी एक अभिनेत्री गुल पनागनेही या घटनेची निंदा केली आहे. 'तिरंग्याचा अपमान कोणीही करू नये. हे मुळीच मान्य नाही. सर्वांनी एकमताने याचा निषेध करायला हवा.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qNmQf8