Full Width(True/False)

'लव्ह जिहाद हा तर 'तमाशा', कोणाचंही धर्म परिवर्तन करणं चुकीचं'

मुंबई- सिनेमांमध्ये उत्तम अभिनय आणि निर्भिडपणे आपलं मत मांडण्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले अभिनेते नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर उघडपणे बोलताना दिसतात. यासाठी त्यांना अनेकदा टीकेला सामोरं जावं लागतं. यावेळी त्यांनी '' वर सुरू असलेल्या वादावर कडक आक्षेप घेतला आहे. यासाठी त्यांनी आणि त्यांच्या लग्नाचं उदाहरण दिलं. लव्ह जिहाद हा तर तमाशा नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत आपल्या मनातली चिंता व्यक्त करताना म्हटलं की, 'लव्ह जिहाद'च्या नावाखाली हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. यूपीमध्ये लव्ह जिहादच्या तमाशात लोकांना कसं विभागलं जात आहे हे पाहून मला खूप राग येतो. ज्यांनी हा शब्द तयार केला आहे त्यांना जिहाद शब्दाचा अर्थ माहीत नाही. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल असा विचार करण्या इतका कोणी मूर्ख कसा असेल हे मला समजत नाही.' 'एखाद्याचं धर्मांतर करणं पूर्णपणे चुकीचं' लग्नाबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले की रत्ना पाठक लग्नानंतर आपला धर्म बदलणार नाहीत हे त्यांनी आपल्या आईला स्पष्टपणे सांगितलं होतं. नसीर पुढे म्हणाले की, 'माझी आई अशिक्षित होती, रूढीवादी कुटुंबात मोठी झाली, दिवसातून पाचवेळा नमाज करायची, तिने आयुष्यभर उपवास केले, हजला गेली. ती म्हणायची लहानपणापासून आम्ही तुम्हाला जे शिकवलं त्या गोष्टी कशा बदलतील? एखाद्याचं धर्मांतर करणं पूर्णपणे चुकीचं आहे. 'मी का घाबरू? मी माझ्या देशात आणि माझ्या घरात आहे' २०१८ मध्ये, नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत गायीवर होणाऱ्या राजकारणावर टीका करत त्यांना आपल्या मुलांची काळजी वाट असल्याचं म्हटलं होतं. या मुलाखतीनंतर नसीरुद्दीन शाह यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. याबाबत ते म्हणाले की, 'मी म्हणालो होतो की इथे माणसाला मारण्यापेक्षा गायीचा मृत्यू महत्वाचा आहे. नेमकी याच गोष्टीचा मला राग आहे.' 'मी घाबरलो आहे असं कधीच म्हटलं नाही. मी भीती हा शब्द कधीही वापरला नाही. मी बरेच वेळा असं म्हणालो आहे की मी रागावलो आहे पण घाबरत नाही. मी का घाबरू? मी माझ्या स्वतःच्या देशात, माझ्या घरात आहे. माझ्या कुटुंबाच्या पाच पिढ्या या मातीत मिसळल्या आहेत. माझे पूर्वज ३०० वर्ष येथे राहत आहेत. या गोष्टी मला भारतीय बनवत नाहीत तर मग कोणत्या गोष्टी बनवणार?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XMHdwB