Full Width(True/False)

'या' व्यक्तीमुळं साराच्या हातून गेले दोन बिग बजेट चित्रपट

अभिनेत्री सारा अली खानच्या हातून आणखी एक चित्रपट गेला आहे. ‘ २’ हा चित्रपट मध्यंतरी तिला सोडावा लागला. त्यानंतर ‘अॅनिमल’ हा चित्रपटातूनही तिला वगळण्यात आलं. तिच्या हातून चांगले बिग बजेट चित्रपट गेल्याची चर्चा आहे. हे कशामुळे घडतंय ते कळलेलं नसलं, तरी चित्रपट, साराची भूमिका आणि मानधन यात बराच हस्तक्षेप केला जातो आणि त्याबद्दलचे निर्णय तिची आई घेते, असंही बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी साराला ‘हिरोपंती २’ मधून बाहेर पडावं लागलं. तेव्हा त्याची चर्चाही झाली. ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटासाठी आधीपासून साराच्या नावाची चर्चा होती. तिच्या जागी आता अभिनेत्री तृप्ती डिमरीला घेण्यात आल्याचं कळतंय. या मागच्या कारणांबाबत कुणी अधिकृतपणे काही बोललं नसलं, तरी त्याचीच चर्चा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bpGvgx