Full Width(True/False)

कोण पटकावणार 'गोल्डन पिकॉक'? 'हे' भारतीय चित्रपट आहेत शर्यतीत

मुंबई टाइम्स टीम जागतिक मनोरंजन विश्वात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा '' अर्थात पुढच्या आठवड्यात संपन्न होणार आहे. गोव्यात रंगणाऱ्या या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनदर राउंड’ या चित्रपटानं उघडणार आहे. तर कियोशी कुरोसावा यांचा ‘’ या जपानी चित्रपटानं महोत्सवाची सांगता होणार आहे. ‘अनदर राउंड’ हा डॅनिश आणि स्वीडिश भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे डेन्मार्कची ऑस्करसाठी अधिकृत एंट्री होती. यंदा महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील सर्वोत्तम १५ सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यातील एका चित्रपटाला मानाचा '' हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अर्जेंटीनाचे फिल्ममेकर हे यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे प्रमुख परीक्षक आहेत. त्यांच्या साथीला प्रसन्ना विथानागे (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयत हुसेन (बांग्लादेश) आदी जाणकार मंडळींची निवड समिती आहे. तसंच महोत्सवात एकूण २३ फिचर फिल्म्स आणि २० नॉन-फिचर फिल्म्स प्रदर्शित होणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ऑस्ट्रीया येथील संदीप कुमार यांचा ‘मेहरूनिसा’ या चित्रपटाचा देखील वर्ल्ड प्रीमियर यावेळी होणार आहे. महिलेच्या आयुष्यभराच्या स्वप्नांना पंख देणारा हा चित्रपट आहे. ५१व्या इफ्फी महोत्सवात विविध विभागातून एकूण २२४ चित्रपट पहायला मिळतील. यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महोत्सव हायब्रिड पध्दतीनं होणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमींना महोत्सवातील चित्रपट ऑनलाइन पहायला मिळणार आहेत . हे आहेत 'गोल्डन पिकॉक'च्या शर्यतीत द डोमेन (पोर्तुगाल) इनटू द डार्कनेस (डेन्मार्क) फेब्रुवारी (बल्गेरिया, फ्रान्स) माय बेस्ट पार्ट (फ्रान्स) आय नेव्हर क्राय (पोलंड, आयर्लंड) ला वेरॉनिका (चिली) लाइट फॉर द युथ (साऊथ कोरिया) रेड मून टाइड (स्पेन) ड्रीम अबाऊट सोहरब (इराण) द डॉग्स डिडन्ट स्लीप लास्ट नाईट (अफगाणिस्तान, इराण) द सायलेंट फॉरेस्ट (तैवान) द फॉरगॉटन (स्विझर्लंड) ब्रिज(भारत) अ डॉग अँड हिज मॅन (भारत) थेन (भारत)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3npyxXi