कल्पेशराज कुबल स्वतःला रुचेल आणि पटेल अशा कथानकांवर काम करता यावं यासाठी बहुतांश कलाकारांनी निर्मितीचं अस्त्र हाती घेतलं आहे. सध्या हिंदी सिनेसृष्टीत हे चित्र मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. अभिनेत्यांसह आता काही आघाडीच्या अभिनेत्रींनीही सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं आहे. कलाकार निर्माता होणं हे बॉलिवूडसाठी काही नवं नाही. परंतु, हाच ट्रेंड आता मराठी सिने आणि मालिकाविश्वातही दिसून येतोय. अलीकडच्या काळात जितेंद्र जोशी, , , , , , यांसारख्या कलाकारांनी निर्मितीक्षेत्रात उडी घेतली आहे. आपल्याला घडवलेल्या कलाविश्वाला स्वनिर्मितीतून काहीतरी अर्पण करावं हीच भावना यातील प्रत्येक कलाकाराची आहे. आगामी 'गोदावरी' या सिनेमाची निर्मिती हरहुन्नरी अभिनेता यानं केली आहे. विशेष म्हणजे नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मेला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा बेत जितेंद्रनं आखला आहे. लॉकडाउननंतर मराठी सिनेमांचे थिएटरमध्ये मधील प्रदर्शन खडतर वाटत असताना; जितेंद्रनं घेतलेल्या या निर्णयाचं मराठी सिनेविश्वातून कौतुक होतंय. दुसरीकडे हेमंत ढोमे दिग्दर्शित आगामी 'झिम्मा' सिनेमाची निर्मिती अभिनेत्री क्षिती जोगनं केली आहे. लंडनमध्ये या सिनेमांचं चित्रीकरण झालं होतं. सिनेमा तयार असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'ईडक' या सिनेमाची निर्मिती अभिनेता शरद केळकरनं केली होती. या निर्मितीबाबत त्यानं 'मुंटा'ला सांगितलं की, 'अभिनेता असल्यामुळे निर्माता किंवा सिनेमाची निर्मिती करणं किती महत्वाचं आणि आवश्यक आहे; हे मी जाणतो. आपल्याला घडवलेल्या इंडस्ट्रीला आपणही काही देणं लागतो. गोष्ट आणि त्यासाठी असलेलं कलाकारांचं कास्टिंग माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. स्वतःच सिनेमा बनवायचा आणि त्यात स्वतःच गरज नसताना हिरो म्हणून काम करायचं मला पटत नाही. आता यापुढे हा सिनेनिर्मितीचा सिलसिला मी असाच सुरु ठेवणार आहे.' नाट्य आणि मालिका निर्मिती ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि त्यांची कन्या स्वानंदी बेर्डे आगामी 'लाखाची गोष्ट' या नाटकात एकत्र काम करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाच्या निमित्तानं प्रिया बेर्डे नाट्यनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. नितीन चव्हाण लिखित या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजेश देशपांडे यांच्यावर आहे. दुसरीकडे छोट्या पडद्यावर देखील कलाकार हे निर्माते असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेची निर्मिती अभिनेता- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता-लेखक चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. तर 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या निर्मितीची धुरा अभिनेत्री मनवा नाईक हिच्या खांद्यावर आहे. तसंच 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेची निर्मिती अभिनेता सुबोध भावेची निर्मिती संस्था करतेय. गेल्या वर्षी अभिनेता प्रसाद ओकनं त्याच्या पीओव्ही क्रिएशन या निर्मितीसंस्थेची सुरुवात केली होती. त्यामुळे आगामी काळात प्रसाद देखील सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याचं दिसतंय. कोट म्हणून निर्माता झालो! गोदावरी सारखी उत्तम गोष्ट हातात होती. चित्रपटाच्या निर्मितीसाठी फायनान्सर देखील ठरला होता. परंतु, करोनाच्या फटक्यात संबंधित निर्मात्यानं सिनेनिर्मितीतून माघार घेतली. निखिल महाजननं लिहिलेली सिनेमाची संहिता प्रचंड भावली होती. काहीही करुन हा सिनेमा व्हावा अशी आमची इच्छा होती. मला चित्रपटाची खऱ्या अर्थानं ओळख करुन देणाऱ्या दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामतसाठी मला काहीतरी करायचं होतं. त्याचंच स्मरण करुन स्वतः निर्मिती उतरण्याचं ठरवलं. निखिल, पवन मालू या मित्रांची निर्मितीत साथ मिळाली. - जितेंद्र जोशी कलाकार - निर्मितीजितेंद्र जोशी - गोदावरी (चित्रपट)क्षिती जोग - झिम्मा (चित्रपट)शरद केळकर - ईडक (चित्रपट)प्रिया बेर्डे - लाखाची गोष्ट (नाटक)दिग्पाल लांजेकर - चंद्र आहे साक्षीला (मालिका)मनवा नाईक - सुंदरा मनामध्ये भरली (मालिका)प्रसाद ओक - पीओव्ही क्रिएशन.. अ प्रसाद ओक व्हिजन
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rWHNFT