Full Width(True/False)

कोट्यवधींच्या कर्जात बुडालाय बिग बॉसचा स्पर्धक, अजब आहे कारण

मुंबई- मधील स्पर्धक अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसला. नुकत्याच झालेल्या भागात स्वतः विकासने त्याच्यावर १.८ कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर कुटुंबातील सदस्यांमुळे आपल्याला या सर्व अडचणी येत असल्याचा आरोप विकासने यावेळी केला. विकास मागील भागात त्याच्या आईबद्दल बोलत होता तेव्हा अली गोनीने त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला. पण तरीही विकास बोलतच होता. विकास म्हणाला की, 'मी ज्या परिस्थितीतून गेलो होतो त्याचा एकदा विचार करा. माझ्या आई- बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर माध्यमांसमोर त्यांच्या विरोधात गेलो तर मला मालमत्ता गमवावी लागेल. विकासने सांगितलं की, त्याने आईला घरातून जायला सांगितलं कारण तो कर्जात होता. विकासच्या चाहत्यांना त्याचं हे रुप फारसं आवडत नाहीए. अनेक यूझर्सने लिहिले की, 'विकास गुप्ता टीव्हीवर वैयक्तिक जीवनातले प्रश्न उपस्थित करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शोमध्ये टिकून राहण्यासाठी तो पुन्हा बाहेरच्या गोष्टी घरात आणत आहे. बिग बॉस १४ मधील ककाही काही एपिसोडमध्ये विकास गुप्ताने दावा केला होता की अर्शी खान त्याला ब्लॅकमेल करत होती. एवढंच नाही तर अर्शीने त्याला काही रेकॉर्डिंगही पाठवले होते. विशेष म्हणजे विकास गुप्ता हा प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माता आहेत. विकास यापूर्वी बिग बॉसच्या अकराव्या सीझनचा भाग होता. शोमध्ये विकासला मास्टरमाइंड म्हटलं जायचं. तो मास्टरमाइंड का आहे हे त्याने शोमध्ये वेळोवेळी सिद्धही केलं होतं. विकास बिग बॉसचा किताब जिंकू शकला नसला तरी या शोने त्याला बरीच प्रसिद्धी दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3t9L7y3