Full Width(True/False)

'मिर्झापूर'चा मुन्ना भय्या 'या' चित्रपटात दिसणार हटके भूमिकेत

मुंबई: '’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांबरोबरच ‘’, ‘’ या वेब सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेता यानं आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप उमटवून हट के भूमिका साकारणारा हा अभिनेता आता ‘मेरे देश की धरती’ या हिंदी चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मॉर्डन लूक आणि हातात कुदळ अशा हट के पेहरावात तो यात दिसतोय. दोन इंजिनीअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी शेतकरी बनतात अशी या सिनेमाची गोष्ट असल्याचं कळतं. ‘आपल्या देशात असंख्य शेतकरी प्रचंड मेहनत करूनही पोटभर जेवू शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदललं जाऊ शकतं. त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश या चित्रपटातून दिला आहे. तसंच माझी भूमिकाही प्रेक्षकांना नक्की आवडेल', असं दिव्यांदूनं सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39tLVpx