नवी दिल्लीः इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अनेक लोक गुगलवर संबंधित कंपनीचे कस्टमर केयर नंबर सर्च करतात. त्यांना फोन करतात. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या अकाउंटमधून पैसे गायब होतात. अशा घटना रोज देशात ऐकायला मिळतात. गुगल सर्चमध्ये कस्टमर केयरचा नंबर सर्च करताना नेहमी पहिला रिझल्ट हा फेक नंबर असतो. परंतु, लोकांना यासंबंधीची माहिती नसते. गुगलवर नंबर मिळाल्यानंतर लोकांना वाटते की, त्यांनी खऱ्या खुऱ्या कस्टमर केयरला फोन लावला आहे. परंतु, खरं म्हणजे यात जास्तीत जास्त लोकांना फेक कस्टमर केयरशी नव्हे तर एका फ्रॉड कॉलशी संपर्क केलेला असतो. वाचाः कसा असतो कस्टमर केयर फ्रॉड कस्टमर केयर फ्रॉड मध्ये सर्वात मोठे शस्त्र म्हणजे रिमोट कंट्रोलचे अॅप होय. सायबर गुन्हेगार म्हणजेच फेक कस्टमर केयरचे लोक या मेसेजमधून एक लिंक पाठवत असतात. ज्यातून त्यांना रिमोटचा अॅक्सेस मिळत असतो. कोणताही अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याचा संपूर्ण अॅक्सेस फ्रॉडच्या हातात जातो. एक अॅप डाउनलोड केल्यानंतर तुमची फसवणूक करणाऱ्यांच्या फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होते. यानंतर यूपीए लॉगिन करण्यास सांगितले जाते. यानंतर ते ओटीपी सुद्धा पाहून घेतात. रिमोट कंट्रोलचे हे अॅप मेलवेयर अॅप नसतात. हे अॅप खूप कामाचे असतात. परंतु, काही जण त्याचा चुकीचा फायदा उचलतात. कोणतीही कंपनीचे कस्टमर केयर सपोर्ट कधीही रिमोट कंट्रोलचे अॅप डाउनलोड करण्यास सांगत नाहीत. त्यामुळे कुणी असे सांगितले तर चुकूनही त्यांचे ऐकू नका. नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. वाचाः कोणीही सांगितले तरी चुकूनही हे अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू नका 1. TeamViewer QuickSupport 2. Microsoft Remote desktop 3. AnyDesk Remote Control 4. AirDroid: Remote access and File 5. AirMirror: Remote support and Remote control devices 6. Chrome Remote Desktop 7. Splashtop Personal- Remote Desktop वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pX6tMB