Full Width(True/False)

राम मंदिरासाठी अक्षयने केलं दान, यूझरने काढली वैष्णोदेवीची आठवण

मुंबई- गेल्या १४ जानेवारीपासून अयोध्येत राम मंदिराच्या बांधणीसाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत लोक त्यांच्या श्रद्धेनुसार देणगी देत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही या अभियानाचं समर्थन करत देणगी देण्याचं आवाहन केलं आहे. यासंबंधी अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला असून बांधण्यात त्याने योगदान दिलं असल्याचं सांगितलं. अक्षयने हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे त्याच्याच एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत त्याला ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही तर त्याला शेतकरी आंदोलन, त्याच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून ट्रोल केलं जात आहे. अक्षयच्या जुन्या मुलाखतीचं कात्रण शेअर करत एका यूझरने त्याला प्रश्न विचारले. अक्षयने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, 'मी वैष्णोदेवीला मानतो पण आता तिथे जात नाही. कारण एका फेरीचा खर्च दोन ते अडीच लाख रुपये होतो. आता जर मला वैष्णोदेवीला जायची इच्छा वाटली तर मी अडीच लाख वेगळे काढतो.' 'ते टाटा मेमोरियलमधील कर्करोग रुग्णांना मदत म्हणून देतो किंवा इतर गरजूंना देतो. यातच वैष्णोदेवीचं दर्शन होऊन जातं. ती माझ्या घरीच आहे. कुठेही जायची गरज नाही. मंदिराचा अर्थ मनाच्या आत असा आहे हे मला फार उशीरा कळलं. देवीची खूप कृपा आहे माझ्यावर आणि तिनेच मला हा मार्ग दाखवला आहे.' एका यूझरने, 'शेतकरी आंदोलनाला तुम्ही किती मदत केली' असा प्रश्न विचारला. तर त्याचवेळी दुसर्‍या यूझरने 'राम सेतू सिनेमाचं आतापासून सिनेमाचं प्रमोशन करण्यास सुरवात केली. राम मंदिराचा आधार घेत सिनेमा हिट करा आणि नंतर हिंदू धर्माची थट्टा उडवून तुझ्या जवळच्या लोकांना खूश कर. तू एक मोठा कलाकार आहे. लोकांना आता सगळं समजलं आहे. तू त्यांना आता मूर्ख बनवू शकणार नाहीस. जय श्री राम.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39God8u