Full Width(True/False)

...म्हणून मी न्यूड फोटोशूट केलं; अभिनेत्री वनिता खरातनं केला खुलासा

मुंबई टाइम्स टीम महाविद्यालयीन दिवसांत एकांकिकेतून काम करत आता थेट मराठी-हिंदी चित्रपटात मजल मारलेल्या हरहुन्नरी अभिनेत्री हिनं 'महाराष्ट्र टाइम्स'च्या फेसबुक लाइव्हमधून वाचकांशी संवाद साधला. वनिता खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाली ते '' या कार्यक्रमातून. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या वनितानं या वर्षाच्या सुरुवातीला '' या संकल्पनेच्या अंतर्गत एक धाडसी पाऊल उचललं आणि त्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. या निमित्तानं तिच्याशी झालेल्या गप्पांमध्ये तिनं तिची मतं स्पष्टपणे मांडली. मराठी रंगभूमी ते हिंदी चित्रपट हा प्रवास, कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी, रंगभूमीवरचं प्रेम या गोष्टींवर तिनं चाहत्यांशी गप्पा मारल्या. ० न्यूनगंड नाही मला कशाचाही न्यूनगंड नाहीये. 'बॉडी पॉझिटिव्हिटी'चा संदेश देण्यासाठीच मी केलं. ज्यांना फोटोत फक्त अश्लीलता दिसली किंवा दिसते त्यांच्या त्या मानसिकतेसाठीच हे फोटोशूट आहे. कारण अश्लीलता त्यांच्या नजरेत आहे. मला शरीराचा न्यूनगंड कधीच नव्हता. शाळेतही कधी असं वाटलं नाही. आपल्याला चिडवणाऱ्या व्यक्तीला सकारात्मकतेने उत्तर दिलं की कोणी आपल्याला चिडवतच नाही. ० आत्मविश्वास वाढला कलाकार म्हणून आव्हान स्वीकारणं मला आवडतं. बॉडी पॉझिटिव्हिटीचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून मी फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. अभिजीत पानसे यांनी मला ही संकल्पना सांगताच मी त्यांना होकार दिला. हे फोटोशूट करताना अजिबाच भीती वाटली नाही. किंबहुना त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तसंच माझाच माझ्या शरीराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. माझ्या फोटोवर अनेकांच्या सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियाही मिळाल्या. ० घरच्यांचा पाठिंबा मोलाचा फोटोशूट केल्यानंतर घरी सांगितलं. घरचे काय म्हणतीय ही भीती होती. पण त्यांनी पाठिंबा दिला. माझ्या आईची प्रतिक्रिया बघून मला सुखद धक्का बसला. ती म्हणाली की, हा तुझ्या कामाचा भाग आहे आणि तू करशील ते योग्यच करशील. माझ्या भावानेही कौतुक केलं. घरच्यांचा पाठिंबा असल्यानं आता बाकी जग काय म्हणतंय यानं मला फार फरक पडत नाही. ० कामासाठी नव्हे; संदेशासाठी सिनेइंडस्ट्रीत मला काम मिळावं म्हणून मी न्यूड फोटोशूट केलेलं नाही. तर एक सामाजिक संदेश देण्यासाठीच मी ते करायचं ठरवलंय. सिनेविश्वातील इतर अनेक अभिनेत्रींप्रमाणे मलाही वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतील. पण काम मिळवण्यासाठी मी फोटोशूट केलेलं नाही. ० नाटक जास्त जवळचं नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात काम करायला आवडेल. चित्रपटातील भूमिका अजरामर होते. पण नाटकाला मिळणाऱ्या लाइव्ह प्रतिसादाची मजाच काही औरच. त्यामुळे माझं नाटकावर जास्त प्रेम आहे. ० कॉलेजच्या आठवणी मला अजूनही कॉलेजची प्रत्येक तालीम आठवते. एकांकिका, सेट उचलणं, बॅकस्टेजची कामं, हे सगळंच आठवतं. आताही कोणी विचारलं की एकांकिका करशील का तर लगेच हो म्हणेन. किर्ती कॉलेजमध्ये असताना आम्ही केलेली 'नहीं तो गोली मार दुंगा' ही एकांकिका लोकप्रिय ठरली होती. आम्ही त्या वर्षीची एकूणएक सगळी बक्षीसं मिळवली होती. ० ते व्यंग नाही लठ्ठपणाच्या विनोदाकडे मी सकारात्मकतेनं बघते. विनोद करणं हा कामाचा भाग आहे. वैयक्तिक आयुष्यात ते कधीच आड येत नाही. जाडं असणं हे व्यंग नाही. त्यामुळे कोणाच्या व्यंगावर आम्ही बोलत नाही. पण वैयक्तिक आयुष्यात लठ्ठपणावरून कोणी कोणाला काही बोलू नये. ० नकारात्मक भूमिका हवी प्रेक्षकांनी माझ्या फक्त विनोदी भूमिका बघितल्या आहेत. आता जरा वेगळेपण हवंय. नकारात्मक भूमिका साकारण्याची प्रचंड इच्छा आहे. मालिकांचा फार अनुभव नाही; पण संधी मिळाली तर तिथेही काम करायचंय. संकलन : संपदा जोशी


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39qvZV6