Full Width(True/False)

पहिल्या मजल्यावरून खाली पडला मुलगा, सोनू सूदने वाचवले प्राण

मुंबई- काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेल्या सोनू सोद याने काळात हजारो लोकांना मदत केली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात त्याचं मदत कार्य सुरू होतं. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. आता त्याने पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सहा वर्षाच्या मुलाची मदत केली आहे. त्याचं झालं असं की एक सहा वर्षाचा मुलगा छतावरून खाली पडला. त्याच्या आई- वडिलांकडे त्याच्या उपचारासाठीचे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी मदतीसाठी सोनूला विचारले. यानंतर अभिनेत्याने मुलाला आवश्यक ते उपचार करण्या आर्थिक मदत करण्याचं ठरवलं. सध्या मुलावर डॉक्टर आवश्यक ते उपचार करत असून तो देखरेखीखाली आहे. एका यूझरने या संबंधी ट्वीट करून सोनूचे आभार मानले. त्याने लिहिले की, 'तो देवाचा अवतार नाही असं कोण म्हणतो? तो एकमेव देव आहे.' त्याच्या या ट्वीटला उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'जाको राखे साइयाँ.. मार सके ना कोय.' जुहूमधील सहा मजली निवासी इमारतीचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यासंदर्भात बीएमसीने याला नोटीस पाठवली होती. दरम्यान, सोनू शुक्रवारी शिर्डीच्या साई धाम येथे पोहोचला. साईबाबांची पूजा केल्यानंतर त्याला यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्याने म्हटलं की, 'सध्या साईंच्या दरबारात आलो आहे, इतर छोट्या- मोठ्या गोष्टींची काळजी करू नये.' मजुरांच्या मदतीच्या प्रश्नावर सोनू म्हणाला की, देवाच्या कृपेने ही जबाबदारी मला देण्यात आली. असंही काही नव्हती की मला मजुरांना जबरदस्तीने मदत करावी लागली. पण मला वाटतं की ही संपूर्ण देवाने मला दिली. अजूनही अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. असं असलं तरी बीएमसीने अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या पत्नीविरूद्ध बेकायदा बांधकामाचा गुन्हा दाखल केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38tQ900