Full Width(True/False)

‘फेसबुक’ यूजर्स सावधान! गेमिंग, डेटिंग, चॅटिंगसाठी FB लॉगिन वापरताय?

म. टा. प्रतिनिधी, पुणे गेमिंग, , यांसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्ड पार्टी अॅपचा ‘फेसबुक लॉग इन’द्वारे तुम्ही वापर करत असाल, तर सावधान! ‘लॉग इन’च्या याच पद्धतीने यूजर्सची माहिती वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवली जात असून, या माहितीचा गैरवापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुक वापरणाऱ्या ग्राहकांनी अशी अॅप वापरताना सावधानता बाळगण्याचा इशारा सायबर तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. वाचाः केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीने नुकतीच फेसबुकची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे. यात पाच लाखांहून अधिक भारतीयांच्या माहितीचा समावेश आहे. त्यावरून कारवाईही सुरू झाली आहे. ही माहिती चोरली गेली असल्याचे ‘फेसबुक’नेही मान्य केले आहे. ‘फेसबुक’कडून ही माहिती पुरवण्यात आली नसून, फेसबुकद्वारे ‘थर्ड पार्टी अॅप’ ‘लॉग इन’ केलेल्या अॅपकडून ही माहिती चोरण्यात आली आहे. वाचाः या अॅपच्या वापरकर्त्यांच्या केवळ लॉग इनचा तपशील, त्यांचा फोटो आणि फेसबुकवर असलेली मित्रयादी याचा वापर करणे अपेक्षित असताना ‘लॉग इन’ करणाऱ्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचाही वापर केला जात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. सायबर तज्ज्ञांनी या संदर्भात इशारा दिला असून, फेसबुक वापरकर्त्यांना कोणत्याही अॅपचे ‘लॉग इन’ फेसबुकद्वारे करण्याचे टाळावे, असा सल्ला दिला आहे. वाचाः फेसबुककडून ‘प्रोफाइल लॉक’ नावाचा पर्याय सध्या उपलब्ध करण्यात आला आहे. हा पर्याय वापरल्यानंतर आपली फेसबुकची माहिती कोणीही वापरू शकत नाही, असा अनेकांचा समज झाला आहे. तो चुकीचा असून, प्रोफाइल लॉक केली, तरी थर्ड पार्टी अॅपला ‘लॉग इन’ झाले, तर माहिती चोरणे सहज शक्य आहे. नागरिकांनी या संदर्भात माहिती घ्यावी, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. वाचाः थर्ड पार्टी अॅपसाठी वापरा ‘पर्यायी अकाउंट’ फेसबुक वापरकर्त्यांना फेसबुकद्वारे ‘थर्ड पार्टी अॅप’वर ‘लॉग इन’ करायचेच असेल, तर आपल्या मूळ अकाउंटव्यतिरिक्त दुसरे अकाउंट उघडून त्याचा अशा अॅपसाठी वापर करण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञ देत आहेत. त्या अॅपवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती न टाकता त्या अकाउंटचा वापर केव‌‌ळ अॅप्सच्या ‘लॉग इन’साठी करण्यात यावा, असे तज्ज्ञ सांगत आहेत. फेसबुकच्या अकाउंटमधील माहिती चोरली जात असल्याचे वास्तव आहे. यापुढेही ही माहिती चोरली जाण्याचे प्रकार वाढणार आहेत. नुकतीच भारतीयांची माहिती चोरली गेल्याचेही स्पष्ट झाले. यावरून धडा घेण्याची गरज आहे. फेसबुकचा वापर करताना ‘थर्ड पार्टी अॅप’चे ‘लॉग इन’ फेसबुकद्वारे न करता इतर पर्यायांचा वापर केला, तर वैयक्तिक माहिती इतर कुणाला मिळण्याचे प्रमाण कमी होतील. - ओंकार गंधे, सायबर तज्ज्ञवााचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iUZLV0