Full Width(True/False)

रेडमीच्या 'या' दोन स्मार्टफोनला मिळतेय MIUI 12 अपडेट, लाखो युजर्संना होणार फायदा

नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी शाओमीचे दोन बजेट स्मार्टफोन स्मार्टफोन आणि ला मिळणे सुरू झाले आहे. याचाच अर्थ लेटेस्ट मीयूआय १२ अपडेट मिळत असल्याने लाखा रेडमी ८ आणि रेडमी ८ए युजर्संना याचा फायदा मिळणार आहे. रेडमी ८ ला मिळालेले नवीन अपडेटचे व्हर्जन MIUI V12.0.1.0.QCNINXM आहे तर रेडमी 8ए ला मिळालेले व्हर्जन MIUI V12.0.1.0.QCPINXM आहे. वाचाः Xiaomi ने लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट द्वारे दोन्ही Redmi Mobiles च्या यूजर इंटरफेस-लेवल मध्ये अनेक बदल केले आहेत. अपडेट वरून रेडमी ८ आणि रेडमी ८ ए च्या ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जनमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. याआधी दोन्ही फोनमध्ये अँड्रॉयड १० देण्यात आले होते. शाओमीने मीयूआई 12 अपडेटला बॅच बनवून रेडमी ८ आणि रेडमी ८ ए युजर्ससाठी रोलआउट करणे सुरू केले आहे. अनेक युजर्संनी सोशल मीडियावर लेटेस्ट अपडेट मिळत असल्याचे सांगून ही माहिती शेयर केली आहे. हे अपडेट भारतीय युजर्संसाठी जारी करण्यात आले आहे. वाचाः हे बदल होणार या रेडमी स्मार्टफोनला मिळालेल्या अपडेट लेटेस्ट जानेवारी २०२१ अँड्रॉयड सिक्योरिटी पॅचसोबत जारी करण्यात आले आहे. अपडेट नवीन एनिमेशन इफेक्ट् सोबत येते आहे. MIUI 12 अपडेट Redmi 8 आणि Redmi 8A स्मार्टफोन मध्ये डार्क मोडला ऑप्टिमाइज करतो आहे. तसेच लँडस्केप व्ह्यूमध्ये कंट्रोल सेंटर लेआउटला इंप्रूव्ह करतो. युजर्संना स्टेट्स बार आणि नोटिफिकेशन्स शेड मध्ये सुधारणा पाहायला मिळेल. वाचाः वाचाः वाचाः वााचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3teuZeG