Full Width(True/False)

बजेट पाहून नव्हे तर या गोष्टी पाहून चित्रपटाची निवड करतो; आयुष्मान झाला व्यक्त

मुंबई: हट के आणि बोल्ड विषयांवर बेतलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत अभिनेता यानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळे मनोरंजनसृष्टीत त्यानं केलेल्या चित्रपटांना ‘आयुष्मानचा जॉनर’ असं म्हणून संबोधलं जातंय. याविषयी त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणतो,‘चित्रपटाचं बजेट, त्याची भव्यता पाहून मी कधीच चित्रपटाची निवड केली नाही. आशय आणि वेगळेपण पाहूनच मी चित्रपट निवडतो. मी अभिनय केलेले चित्रपट हे सर्वोत्तम कलाकृतींमध्ये गणले जावेत, अशी माझी इच्छा असते.’ संवदेनशील अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुष्माननं नेहमीच चाकोरीबाहेरचा विचार केला आहे. त्याबाबत तो म्हणतो,‘टॅबू मानल्या जाणाऱ्या विषयांवर मी माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून संवाद साधू इच्छितो. ते विषय महत्त्वाचे असूनही लोकांना स्पष्टपणे मांडता येत नाहीत. मी अशाच विषयांशी अधिक जोडला जातो. अशा विषयांना अनेक पदर असतात आणि यातून प्रेक्षकांना काही तरी मिळतं. प्रेक्षकांना नवं आणि चाकोरी मोडणाऱ्या गोष्टी पडद्यावर पहायच्या आहेत. एक कलाकार म्हणून त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं आणि त्यांना आनंद देणं हे माझं काम आहे.’ सध्या आयुष्मानच्या आगामी ‘’ या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iXZO2y