नवी दिल्लीः सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच केले आहे. Samsung एक बजेट स्मार्टफोन आहे. यात ६.५ इंचाचा इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. सध्या या फोनला थायलँडमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः Samsung Galaxy A02 ची किंमत थायलँडमध्ये या फोनची किंमत ७ हजार ३०० रुपये ठेवली आहे. कंपनीने सध्या या फोनला एकाच व्हेरियंटची म्हणजेच २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज फोनची किंमत जाहीर केली आहे. हा फोन डेनिम ब्लॅक, डेनिम ब्लू, डेनिम ग्रे आणि डेनिम रेड कलर मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतात हा फोन कधीपर्यंत लाँच करण्यात येईल यासंबंधी कोणतीही माहिती अद्याप शेयर करण्यात आली नाही. वाचाः Samsung Galaxy A02 चे फीचर्स सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनमध्ये 1.5GHz चे मीडियाटेक MT6739W क्वॉडकोर प्रोसेसर मिळणार आहे. हा फोन 2GB+32GB, 3GB+32GB आणि 3GB+64GB स्टोरेज व्हेरियंट मध्ये मिळणार आहे. वाचाः Samsung Galaxy A02 फोनचा कॅमेरा सॅमसंगच्या या फोनमध्ये ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात लेन्स १३ मेागपिक्सलचा दिला आहे. दुसरा लेन्स २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आङे. कॅमेऱ्यासोबत ८ झूम एक्स मिळतो. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 7.75W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटी साठी फोनमध्ये 4G LTE, 3.5mm हेडफोन जॅक, Wi-Fi b/g/n, ब्लूटूथ v5.0, GPS+Glonass आणि मायक्रो यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YmAn12