Full Width(True/False)

WhatsApp आता आणखी सुरक्षित, आले नवीन सिक्योरिटी फीचर

नवी दिल्लीः आपल्या डेस्कटॉप आणि वेब अॅप्समध्ये सिक्योरिटीसाठी नवीन फीचर जोडत आहे. व्हॉट्सअॅप युजर्सला आता वेब किंवा डेस्कटॉपवर आपले अकाउंट लिंक करण्याआधी अकाउंट व्हेरिफाय करावे लागणार आहे. नवीन व्हॉट्सअॅप फीचर पुढील आठवड्यात युजर्संसाठी ग्लोबली रोलआउट करण्यात येणार आहे. वाचाः अँड्रॉयडवर व्हॉट्सअॅप युजर्स व्हॉट्सअॅप वेब किंवा डेस्कटॉपला ऑथेंटिक करण्यासाठी फेस किंवा फिंगरप्रिंट अनलॉकचा वापर करता येऊ शकणार आहे. आयफोन युजर्सला आपल्या अकाउंटवर व्हेरिफाय करण्यासाठी फएस आयडीचा वापर करता येऊ शकणार आहे. ज्यावेळी युजर्संना नवीन लॅपटॉप किंवा पीसीवर आपला व्हॉट्सअॅप अकाउंट लिंक करतील त्यावेळी सिक्योरिटी व्हेरिफिकेशन पॉप अप करावे लागेल. तसेच फोनवरून क्यूआर कोड स्कॅन करण्याआधी ही प्रोसेसर पाहता येईल. वाचाः व्हॉट्सअॅप आपल्या मोबाइल अॅप्सवर सुद्धा व्हॉट्सअॅप वेबसाठी युजर इंटरफएसला अपडेट करावे लागत आहे. नवीन यूआय मध्ये आता प्लस आयकॉनच्या जागी लिंक अ डिव्हाइस लिहिलेले दिसणार आहे. दरम्यान, यात मोठा बदल करण्यात आला नाही. कारण, युजर्स आता हेही पाहू शकतील की, त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट कोणत्या डिव्हाइसेजवर कनेक्टेड आहे. तसेच त्याल अनलिंक करू शकतात. नवीन व्हॉट्सअॅप वेब यूआय याच महिन्यात बीटा युजर्सला पाहणे सुरू होईल. वाचाः व्हॉट्सअॅपने एक रिलीज जारी करून या नवीन फीचरची घोषणा केली आहे. युजर्संना आश्वासन दिले आहे की, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरक्षित आहे. तुमचा डिव्हाइसवर फेस किंवा फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन प्रायव्हसीला सुरक्षित ठेवते. व्हॉट्सअॅप तुमच्या डिव्हाइसला ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्टोर बायोमेट्रिक इन्फर्मेशनला अॅक्सेस करू शकत नाही. वाचाः फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने नुकतीच एक प्रायव्हसी पॉलिसी अपडेट आणल्याने त्यावर जगभरातून टीका केली जात आहे. कंपनीने हे अपडेट पुढे ढकलावे लागले आहे. नवीन पॉलिसी अंतर्गत व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुक सोबत शेयर केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीच्या या नवीन अपडेट पॉलिसीमुळे अनेक जण सिग्नल आणि टेलिग्रामकडे जात आहेत. वााचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36ont6X