मुंबई: शाहिद कपूरचा आज वाढदिवस. शाहिदनं बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. बॅकग्राउंड डान्सर, सहाय्यक कलाकार अशा छोट्या-मोठ्या भूमिका ते बिग बजेट चित्रपटांचा नायकपर्यंतचा यशस्वी प्रवास शाहिदनं केला. पण त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यासाठी त्याला बरेच कष्ट करावे लागलेत. प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असूनही अनेकदा त्याच्याकडे ऑडिशनला जाण्यासाठी पैसे नसायचे. अनेकदा ऑडिशन झाल्यावर रिजेक्ट केलं जायचं. पण शाहिदनं हार मानली नाही. शाहिदनं त्याला अनेक ऑडिशनमध्ये नाकारलं गेलं होतं असा खुलासा एका मुलाखतीत केला होता. शाहिदनं सांगितल्यानुसार त्याला जवळपास १०० वेळा चित्रपटतील भूमिकेसाठी नाकरण्यात आलं आहे. त्याच्या करिअरच्या सुरुवातीचा काळ फार कष्टदायी होता. त्यानं अनेक ऑडिशन दिल्या आणि शेवटी हातात अपयशच आलं. कारण काहीही असेल पण शाहिदला कोणत्याही चित्रपटासाठी निवडलं जात नव्हतं. पण शाहिदसाठी ही एकमेव समस्या नव्हतं. तो स्वतःचं दोन वेळचं जेवणही मिळू शकेल एवढे पैसेही कमावू शकत नव्हता. तसेच ऑडिशनला जाण्यासाठीही अनेकदा त्याच्याकडे पैसे नसायचे. हा अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर यांचा मुलगा आहे. पण आपल्या वडिलांच्या नावाचा फायदा शाहिदला कधीच झाला नाही. पंकज कपूर यांचा मुलगा असल्यानं शाहिदला कदाचित चांगले चित्रपट ऑडिशन न देताही मिळू शकले असते. पण असं करण्यास शाहिदचाच नकार होता. त्यानं आपल्या वडिलांचं नाव कुठेच वापरलं नाही. तो स्वतःची लढाई स्वतः लढला आणि जिंकला सुद्धा. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेऊन शाहिद आज यशस्वी अभिनेता म्हणून सर्वांच्या समोर उभा राहिला आहे. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर शाहिदला काही टीव्ही जाहिरातींसाठी काम करण्याची संधी मिळाली. मात्र चित्रपटांपर्यंतचा पल्ला गाठणं अजून दूरच होतं. त्यानं जाहिरातींमध्ये काम करणं तसेच बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण चालू ठेवलं आणि अखेर २००३ मध्ये त्याला त्याच्या कष्टांचं फळ मिळालं. त्याला पहिला चित्रपट 'इश्क-विश्क' मिळाला. या चित्रपटानं शाहिदचं आयुष्य बदललं. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि त्याला या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यानं अभिनेत्री अमिषा पटेलसोबत 'विवाह' चित्रपटात काम केलं आणि अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली जागा पक्की केली. दरम्यानच्या काळात शाहिदचे काही चित्रपट हिट झाले तर काही चित्रपट बॉक्स ऑफसवर अक्षरशः कोसळले पण बॉलिवूडमध्ये त्याचा एक स्टँडर्ड तयार झाला. त्याला माहीत आहे की, फ्लॉप चित्रपटांनंतरही तो दमदार कमबॅक सुद्धा करू शकतो. दोन वर्षांपूर्वी 'कबीर सिंग' सारखा सुपरहिट चित्रपट देत शाहिदनं हे सिद्ध सुद्धा केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sraQAJ