Full Width(True/False)

सुव्रतसोबत पुन्हा काम ? नट म्हणून तो खूपच सपोर्टिव्ह आहे पण...

० लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधलं वास्तवं आणि काही दिवसांपूर्वी केलेला ‘’ हा उपक्रम, या विषयी काय सांगशील? - रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये मला स्वतःला एक वेगळी व्यक्ती म्हणून समृद्ध करणारा अनुभव मिळाला. जगभरातले मित्रमैत्रिणी जोडता आले. क्षमतांचा विकास घडविणारं आणि व्यक्ती म्हणूनही खूप काही देणारं ठिकाण, असं मी म्हणेन. आयाम ही त्याचीच देण आहे, असं म्हणता येईल. ० ‘आयाम’च्या माध्यमातून कलाकरांना व्यासपीठ देण्याचा विचार कसा सुचला ?- अनेक मंडळी अशी आहेत, की त्यांची कला बहुआयामी आहे. कुणी उत्तम चित्रकार तितकंच उत्तम परफॉर्मर आहे. या दोन्ही कलांचं द्वैत साधलं जाताना पाहणं खूप आनंदाचं ठरतं. कलाकाराला मुक्तपणे व्यक्त होण्यासाठीची जागा, तुम्हाला जे वाटतं ते सादर करण्याची, स्वतःची प्रेरणा शोधण्याची जागा असावी, या विचारातून आयाम हा उपक्रम सुचला. ० लंडन वास्तव्याबाबत काय आठवणीत आहे?- जगभरातल्या व्यक्तींची मैत्री ही त्यातली सर्वांत मोलाची गोष्ट. माझ्या एका इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीला लंडन, पोलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चायना इथली मित्रमंडळी प्रतिसाद देतात तेव्हा जगाच्या अमुक कोपऱ्यातही आपलं कुणी आहे, ही जाणीव आनंद देते. तिथे असताना अनेक ठिकाणी फिरले, त्या-त्या शहराची नस पकडता आली. ० आगामी ‘’ या चित्रपटासाठी तू दोन वर्षांनी कॅमेऱ्याला सामोरी गेलीस. या अनुभवाबद्दल काय सांगशील?- फारच सुंदर अनुभव आहे. या चित्रपटासाठीचा प्रवास अभिनेत्री म्हणून खूप सुखद आहे. नीना कुळकर्णी, विक्रम गोखले अशा दिग्गजांसोबत आपलं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ० कलाकार म्हणून एक उपजत विक्षिप्तपणा आवश्यक असतो, असं म्हणतात, याच्याशी कितपत सहमत आहेस?- असं असावं असं नाही. काही कलाकारांचा जगाकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्या या दृष्टिकोनातूनच कला निर्माण होते. त्यामुळे काही लोकांना त्यांचं तसं असणं विक्षिप्त वाटू शकतं. आपल्या सभोवती वैविध्यपूर्ण विचारांची, स्वभावांची, जाणीवांची माणसं असणं किती मजेशीर आहे. कलेतून स्वतःकडे वा जगाकडे पाहण्याच्या त्यांच्या त्या वेगळेपणातच मजा आहे. ० आणि तू पुन्हा एकत्र कोणत्या कलाकृतीत दिसणार?- आम्ही एकमेकांचे फार चांगले सहकलाकार नाही. कामाबाबत आमचे स्वभाव खूपच भिन्न आहेत. नट म्हणून तो खूपच सपोर्टिव्ह आहे. पाहता-पाहता आम्ही तीन मालिका आणि एक नाटक केलं. त्याच्यासोबत पुन्हा नाटकच करायला आवडेल. वारसा आणि मी... मोहन आणि शुभांगी गोखले या उत्तम कलाकार असलेल्या पालकांकडून काय वारसा मिळाला, असं विचारताच सखी म्हणते, ‘नट म्हणून या दोघांचंही काम एवढं प्रगल्भ आहे, की त्याच्या जवळपास जाणं, त्या पलीकडे जाणं असं ध्येय किंवा माझा हेतू नाही. तुलना अटळ आहे आणि ती होतेच. आईकडून शिस्त आणि झोकून देऊन काम करणं शिकेन. बाबांकडून आपल्याला चांगल्या अर्थानं स्वतःला प्राधान्य कसं द्यायचं ते शिकता आलं. इतक्या वर्षांनीही जेव्हा त्यांच्या कामाची आठवण निघते तेव्हा त्यांच्या निवडीवर कायम बोललं जातं. कलाकार म्हणून आर्थिक गणितांपलीकडे जात एखादा प्रोजेक्ट तुम्हाला काय देतो आणि तुम्ही कलाकार म्हणून त्याला काय देता, हा त्यांचा विचार मला अधिक खोलवरपणे त्याकडे पाहायची दृष्टी देतो.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39BwlYV