Full Width(True/False)

आग कोणाच्याही घरी लागो...स्पष्टवक्तेपणाबद्दल स्वरा भास्कर बोललीच!

० 'आपके कमरे में...'च्या निमित्तानं पहिल्यांदाच हॉरर कथानकासाठी काम करत आहेस, यासाठी तयारी कशी केलीस? - संहितेमुळे पुढचा मार्ग सुकर होतो. पुढची तयारी कशी करायची आहे, पात्राचे कोणकोणते कंगोरे उलगडून दाखवायचे आहेत हे संहितेमुळे कळतं. या सीरिजची संहिता खुमासदार पद्धतीनं लिहिली होती; त्यामुळे नवीन प्रकाराचा प्रयोग करताना दडपण आलं नाही. ० हॉरर प्रकाराकडे वळावंसं का वाटलं?- हॉरर हा प्रकार आजमावून बघायचाय असं डोक्यात नव्हतं. 'आपके कमरे में...' या सीरिजची संहिता आवडली म्हणून ती स्वीकारली. कथा चांगली आहे, मी साकारणारी व्यक्तिरेखा मला पटली त्यामुळे सीरिज करायचा निर्णय घेतला. ० तुझ्या सीरिजमुळे ओटीटीवर हॉररचा ट्रेंड रुळेल असं वाटतं का?- आमच्या सीरिजमुळे ओटीटीवर हॉररचा ट्रेंड रुळला तर चांगलीच गोष्ट आहे. मी स्वत: उत्सुक आहे. या माध्यमावर हॉरर हा प्रकार रुळताना बघायला आवडेल. ० सीरिजमध्ये प्रस्थापित कलाकरांना घेण्यामागे उद्देश काय असावा असं तुला वाटतं?- मनोरंजनसृष्टीत बदलाचे वारे वाहत आहेत. बडे कलाकार ओटीटीकडे वळत आहेत हे आशादायी चित्र आहे. त्या कलाकारांच्या चाहत्यांना या माध्यमाकडे वळवणं हा उद्देश असू शकतो. आता माध्यमांमधील विभागणी कमी होत आहे. यातली रेषा पुसट होत आहे. कलाकारांना नवीन काहीतरी करायचं आहे. ते प्रयोग ओटीटीवर करता येतात. याचा प्लॅटफॉर्म्स फायदा करुन घेत आहेत. आता ओटीटीचं प्रस्थसुद्धा वाढलं आहे, त्याचं आकर्षण वाटून कलाकारही वळत आहेत. ० सध्या अनेक सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत, हे मुद्दाम करत असतील असं वाटतं का?- चांगलं असो किंवा वाईट असो...त्यामागे उद्देश असतोच. एक अजेंडा ठरलेला असतो. ही काही नवीन गोष्ट नाही. पण, कोणी विरोध करायचा म्हणून विरोध करत असतील आणि कायद्याचं उल्लंघन करत असतील तर ते चुकीचं आहे. या गोष्टी धोकादायक असतात. ० कधी-कधी तुझ्या स्पष्टवक्तेपणाचा तुलाच त्रास होतो का?- तुमच्या मताचा आदर केला जात नसेल, उलट त्यासाठी तुम्हालाच सहन करावं लागत असेल तर त्याचा त्रास होतोच. आग कोणाच्याही घरी लागो; त्याचा प्रत्येकालाच त्रास होतोच. मी उथळपणे मत मांडत नाही. त्यामागे माझा अभ्यास असतो, विचार असतो. अनेक जण सांगतात की, एवढं का बोलते. तिच्यामुळे वाद निर्माण होतो. अशा लोकांकडे मी दुर्लक्ष करते. मी मत मांडत राहणार. ० तुझ्या ट्रोलर्सना काय संदेश देशील?- मला प्रसिद्धी मिळवण्यासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याची गरज नाही. ती प्रसिद्धी ट्रोलर्स मला मिळवून देतात. त्यांची मी ऋणी आहे. ते माझं काम सोपं करतात. त्यांच्यामुळे माझं नाव चर्चेत राहतं. माझं नाव मोठं होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, ते त्यांनी सुरु ठेवावं. अनेकदा पैसे देऊन ट्रोलिंग करायला सांगितलं जातं. माझ्यामुळे ट्रोलर्सचा आर्थिक फायदा होत असेल तर चांगलंच आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3atK6bt