Full Width(True/False)

बिग बॉस फेम स्वामी ओम यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली- मधील वादग्रस्त स्पर्धक यांचं आज निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. रिपोर्टनुसार, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. बुधवारी त्यांनी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. स्वामी ओम यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. स्वामी ओम यांचे मित्र मुकेश जैन यांच्या मुलाने अर्जुनने ही दुःखद बातमी दिली. अर्जुनने सांगितलं की काही दिवसांपूर्वीच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. यापूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून स्वामी ओम बरे झाले पण त्यानंतर त्यांना चालायचा त्रास होऊ लागला. स्वामी ओम यांचे अंत्यदर्शन दुपारी दिल्लीतील निगम बोध घाटात केले जाईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वामी ओम यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. यावेळी ते बरेच चर्चेत होते. वृत्तवाहिनीवरील अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावलं जायचं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हिंदुविरोधी वृत्तीविरोधात आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, स्वामी ओम यांनी बिग बॉसच्या १० व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. शोमध्ये त्यांचं आणि व्ही.जे. बानी यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. यानंतर बिग बॉसने त्यांना घरातून बाहेर जाण्याचा आदेश दिला होता. पण त्यातही स्वामींनी घर सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. यानंतर सुरक्षा रक्षकांनी स्वामी ओम यांना घराबाहेर काढलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oNeOBs