Full Width(True/False)

'या' प्रीपेड प्लानमध्ये मिळणार २७० जीबी हाय स्पीड डेटा, ६ महिन्यांपर्यंत रिचार्जपासून सुटका

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्संसाठी वेगवेगळे प्लान ऑफर करीत आहेत. ज्यात जास्त डेटा दिला जातो. रिलायन्स जिओ पासून एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपन्या युजर्संसाठी जास्तीत जास्त बेनिफिट देण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक दुसऱ्याला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची चढाओढ सुरू आहे. वाचाः रिलायन्स जिओ आणि एअरटेल पेक्षा वेगळे सांगायचे झाल्यास वोडाफोन आयडिया आपल्या युजर्संना ६ महिन्यांची वैधता असलेले प्लान ऑफर करतात. या प्लानची किंमत ११९७ रुपये आहे. हा प्लान अनेक फीचर्स सोबत येतो. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा, कॉलिंग आदी सुविधा दिली जाते. वाचाः वोडाफोन आयडियाचा ११९७ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ६ महिने म्हणजेच १८० दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. युजर्संना एकूण २७० जीबी डेटा दिला जातो. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय विकेंड डेटा रोलओरची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये युजर्संना Vi Movies & TV चे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः जिओचा १२९९ रुपयांचा प्लान जिओ कंपनीच्या पोर्टफोलियोत ११९७ रुपयांच्या जवळपास कोणताही प्लान उपलब्ध नाही. कंपनी १२९९ रुपयांचा प्लान ऑफर करते. याची वैधता ३३६ दिवसांची आहे. यासोबतच २४ जीबी डेटा दिला जातो. डेटा स्पीड संपल्यानंतर युजर्संना 64kbpsची स्पीड मिळते. सर्व नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय ३६०० एसएमएस दिले जातात. युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः एअरटेलचा १४९८ रुपयांचा प्लान एअरटेल कंपनीच्या पोर्टफोलियोत ११९७ रुपयांच्या जवळपास कोणताही प्लान उपलब्ध नाही. कंपनी १४९८ रुपयांचा प्लान ऑफर करते. याची वैधता ३६५ दिवसांची आहे. तसेच २४ जीबी डेटा दिला जातो. सर्व नेटवर्कवर कॉलिंग साठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय ३६०० एसएमएस दिले जाते. युजर्संना एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिक फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. ३० दिवसांसाठी प्राईम व्हिडिओचे फ्री मोबाइल ट्रायल दिले जाते. तसेच शॉ अकादमीचे एक वर्षाचे फ्री कोर्स आणि फ्री हेलोट्यून्स दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aIA1HR