Full Width(True/False)

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलने गुपचूप केलं लग्न? चर्चेला आलं उधाण

मुंबई- 'बिग बॉस' चा १३ वा सीजन गाजवणारी जोडी आणि यांच्याबाबतीत एका खळबळजनक गोष्टीचा खुलासा झाला आहे. सिद्धार्थ आणि शहनाज 'बिग बॉस' च्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सिद्धार्थने 'बिग बॉस १३' च्या विजेत्याच्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं तर शहनाज तिच्या वागण्यामुळे आणि सरळ साध्या स्वभावामुळे चाहत्यांची आवडती बनली होती. घरातून बाहेर पडल्यावरही चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरची चर्चा कायम होती. त्यांची जोडी 'बिग बॉस १३' ची सर्वात लोकप्रिय जोडी मानली जात होती. घरातून बाहेर आल्यावर त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केला नाही. परंतु, आता मात्र चाहत्यांना बुचकळ्यात टाकणारी एक गोष्ट समोर येतेय. सिद्धार्थ आणि शहनाज यांनी कोर्टात लग्न केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि शहनाज यांनी २०२० च्या डिसेंबर महिन्यात कोर्टात लग्न केलं. दोघांनीही मुंबईच्या बाहेर जाऊन लग्न केलं आणि ही गोष्ट त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली. असं म्हटलं जातंय की, सिद्धार्थ आणि शहनाज सध्या त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाही माहिती दिलेली नाही. या गोष्टीची सत्यता येणाऱ्या काळात चाहत्यांसमोर येईलच. ते दोघे 'बिग बॉस १३' मध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. शहनाजने सिद्धार्थसमोर तिच्या प्रेमाची कबुलीदेखील दिली होती. पण सिद्धार्थ शहनाजला त्याची चांगली मैत्रीण म्हणत आला आहे. 'बिग बॉस' संपल्यावर देखील त्यांच्यातील नातं बदललं नाही. तर, शहनाजच्या वाढदिवसाच्या दिवशी सिद्धार्थने तिच्यासाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यात सिद्धार्थची आई देखील आली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लग्नाची बातमी सांगितल्याने त्यांच्या बॉलिवूडमधील करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यांनी ही बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZNOEEu