मुंबई: पॉप स्टार रिहानाच्या एका ट्वीटनं जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत रिहानानं केलेल्या ट्वीटमुळे आता जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी या शेतकरी आंदोलनाला आपलं समर्थन दिलं आहे. सुरू असलेल्या भागात इंटरनेट सेवा बंद केल्यासंदर्भातील एक आर्टिकल आपल्या ट्विटरवर पोस्ट करत रिहानानं ‘आपण याबाबत का बोलत नाही आहोत.’ असं ट्वीट केलं होतं. त्यानंतर तिच्या या ट्वीटला जगभरातून प्रतिसाद मिळाला आणि ती ट्रेंडिंगमध्ये आली. यानंतर तिच्याबद्दल गुगलवर झपाट्यानं अनेक गोष्टी सर्च केल्या गेल्या. रिहानाबद्दल सर्वाधिक माहिती ही भारतात सर्च केली गेली आहे. विशेष म्हणजे भारतातही पंजाबमधून रिहानाला सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. रिहानानं भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी ट्वीट केल्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यात ग्रेटा थनबर्ग, व्हेनिसा नकाते यांचा समावेश आहे. तर या ट्वीटसाठी भारतातील अनेक सेलिब्रेटींनी रिहानाचं ट्वीट रि-ट्वीट करत तिचं कौतुक केलं आहे. भारतीयांनी गुगलवर, रिहाना मुस्लीम आहे? आणि रिहाना रिलीजन या गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत. रिहानानं भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत झपाट्यानं वाढ झालेली दिसत आहे. ट्विटवरील तिच्या फॉलोअर्समध्ये १ मिलियन एवढी वाढ झाली. याआधी तिचे १०० मिलियन फॉलोअर्स होते ते आता १०१ मिलियन झाले आहेत. लोकप्रियतेच्या यादीत रिहाना जगात चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाचे भारतातही लाखो चाहते आहेत.२०१९ मध्ये फोर्ब्सने रिहानाला सर्वात श्रीमंत संगीतकार म्हटलं होतं. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, रिहानाची एकूण मालमत्ता ६०० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४ हजार ४०० कोटी रुपये आहे. ट्विटरवर रिहानाचे १०१ मिलियन फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर, १०० दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या जगभरातल्या सेलिब्रिटींमध्ये रिहाना चौथ्या स्थानावर आहे. 'Don't stop the music', 'Love the way you lie', 'Umbrella' यांसारखे अनेक हिट अल्बम तिने दिले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jcOnUx