Full Width(True/False)

अनिताला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचली एकता, व्हिडीओ केला शेअर

मुंबई: टीव्ही अभिनेत्री नुकतीच आई झाली. ९ फेब्रुवारी रोजी अनितानं गोंडस मुलाला जन्म दिला. याची माहिती तिचा पती रोहित रेड्डीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली होती. त्यानंतर निर्माती अनिताला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. एकता तिच्या इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्यासोबत अनिता हसनंदानी सुद्धा दिसत आहे. अनिता हसनंदानीनं एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे अनिता आणि एकता या दोघी चांगल्या मैत्रिणी सुद्धा आहे. या दोघी या आधी अनेकदा व्हेकेशनसाठी एकत्र गेलेल्या दिसल्या होत्या. त्यामुळे आता मैत्रीण आई झाल्यावर एकता तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचली. एकतानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अनिता बेडवर झोपलेली असून एकता तिला पोझ द्यायला सांगताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एकता कपूर अनिता सोबत सेल्फी घेताना दिसत आहे आणि अनिता सुद्धा हसत हसत तिला पोझ देत आहे. कधी पाउट कर कधी चेहऱ्यावर क्यूट हावभाव ठेवत अनितानं पोझ दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत एकतानं अनिता आणि रोहित रेड्डी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकतानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एकता अनिता आणि रोहित यांना शुभेच्छा देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, 'माझा भाचा आला आहे.' यावरूनच अनिता आणि रोहित यांच्यात किती चांगली मैत्री आहे हे लक्षात येत. एकतानं या आधीही अनितासाठी बेबी शॉवर पार्टी ठेवली होती. अनितानं ९ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास ८ वर्षांनंतर अनिता आणि रोहित आई-बाबा झाले. त्यामुळे त्याचा आनंद या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. प्रेग्नसीच्या काळात अनिता सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिनं वेगवेगळे फोटोशूट सुद्धा केली होती आणि ही सर्व फोटोशूट खूप चर्चेत राहिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tG7fAa