Full Width(True/False)

५००हून अधिक हँडल ब्लॉक; सरकार-ट्विटर संघर्षाची चिन्हे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली शेतकरी आंदोलनासंदर्भात चुकीची माहिती आणि प्रक्षोभक मजकुराचा प्रसार रोखण्यासाठी १,१७८ अकाऊंट्स ब्लॉक करण्याचा आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिला होता. मात्र ट्विटरने या आदेशाचे अंशत: पालन करीत ५००हून अधिक हँडल बंद केली असून तितकीच अकाऊंट भारतापुरतीच ब्लॉक केली आहेत. तर, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होण्याचे कारण देत काही हँडलवर कारवाई केलेली नाही. यावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. वाचाः केंद्र सरकारच्या आदेशाचे अंशत: पालन करण्यामागील भूमिका ट्विटरने बुधवारी सकाळी एका ब्लॉगद्वारे स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, वृत्त माध्यम संस्था, पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकारण्यांची ट्विटर हँडल ब्लॉक केलेली नाहीत. कारण तसे केल्यास त्यांना या देशातील कायद्याने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन झाले असते. ट्विटरच्या या कृतीवर केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील या ‘मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म’च्या मागणीनुसार, माहिती तंत्रज्ञान सचिव या कंपनीशी चर्चा करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच ट्विटरने ब्लॉगद्वारे आपली भूमिका मांडणे गैर आहे, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतात विकसित करण्यात आलेल्या कू या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. वाचाः शेतकरी आंदोलनाविषयी चुकीची माहिती पसरवणारी पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांची १,१७८ अकाउंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने ४ फेब्रुवारीला ट्विटरला दिले होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती पसरवणारे ट्विटर हँडल व हॅशटॅग काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. अशी चुकीची व प्रक्षोभक माहिती गैरसमज निर्माण करण्यासह सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरित परिणाम करते, असे सरकारने म्हटले होते. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित कायद्यानुसार दंड किंवा ७ वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेचा इशाराही ट्विटरला देण्यात आला होता. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञानमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करू द्यावी, अशी विनंती ट्विटरने मंगळवारी केली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान सचिव ट्विटरच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करणार होते. मात्र त्यापूर्वीच ट्विटरने ब्लॉगद्वारे आपली भूमिका मांडल्याने केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qcaugv