० स्पर्धेनं काय दिलं? - सगळं काही दिलं. लोकांचं भरभरुन प्रेम मिळालं. ज्याच्यासाठी मी कार्यक्रमात भाग घेतला होता ते मिळालं. ट्रॉफी मिळाली नाही, याचं दु:ख नाही. कारण मला लोकांचं प्रेम हवं होतं; ते मिळालं. उलट ते प्रेम अपेक्षेपेक्षा कैकपटीनं जास्त मिळालं. या चार महिन्यात खूप काही कमावलं आहे, ते आयुष्यभर साठवून ठेवणार. बिग बॉसच्या घरात मिळालेली शिकवण पुढील वाटचालीसाठी उपयोगी पडेल. ० सगळ्यात आव्हानात्मक काय होतं?- कुटुंब आणि जवळच्या लोकांपासून दूर राहणं हे आव्हानात्मक होतं. त्यामुळे चार महिने कठीण गेले. पण आता स्वत:च्या घरी जाऊन आई-बाबांसोबत वेळ घालवता येतोय ही आनंददायी बाब आहे. विशेष करुन दिशासोबत वेळ घालवता येतोय. मुळात लवकर उठायला लागणार नाही. माझ्या स्वत:च्या घरात आरामात उठू शकतो याहून दिलासा देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. ० बिग बॉसच्या घरातील दिवसांचं थोडक्यात कसं वर्णन करशील?- आयुष्यातला सर्वाधिक रंजक प्रवास होता. खूप काही शिकायला मिळालं. स्पर्धेमुळे स्वत:विषयी माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या. या प्रवासाचं काही मोजक्या शब्दांत वर्णन करताच येऊ शकत नाही, इतकं भरभरुन मिळालं आहे. ० एकदा घराणेशाहीवर बोलला होतास. च्या घरातही आतले-बाहेरचे असा भेद आहे का?- घरात आतले-बाहेरचे असा भेद होत नाही. सगळ्यांना समान पातळीवर बघितलं जातं. ० दिशाला लग्नासाठी मागणी घालणं, हे मतं मिळवण्यासाठी होतं असं अनेकांचं म्हणणं होतं. याबद्दल तुझं मत काय?- अतिशय चुकीचं आहे. कोणाला लग्नासाठी मागणी घातल्यानं मतं कशी मिळू शकतात याचा विचार झाला पाहिजे. हे विचारच योग्य नाहीत. सगळं काही मतासाठी केलं जात नाही. डोकं लावून खेळलं जातं, पण माणसाच्या भावनाही असतात. त्याचा विचार झाला पाहिजे. रिअॅलिटी शोमध्ये रिअल असतं याचा लोकांना विसर पडला आहे. स्पर्धक घरात जे काही करतात ते मत मिळवण्यासाठीच करतात असा प्रेक्षकांचा समज झालेला असतो. पण त्यापुढे जाऊन आम्ही माणूस आहोत, आम्हाला भावना असतात हे विसरु नका. ० इथून पुढचा प्रवास कसा असेल? - अनेक गोष्टी ठरवल्या आहेत. त्या यशस्वीपणे पुढे न्यायच्या आहेत. विशेष म्हणजे लोकांचं प्रेम मिळालं आहे. चाहतावर्ग अधिक व्यापक झाला आहे. त्यांच्याशी गप्पा मारुन त्यांचे आभार मानायचे आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qOFWSo