नवी दिल्ली : चा शानदार OnePlus 9 5G ला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. या फोनला तुम्ही अॅमेझॉन इंडियावरून १३ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर ४९,९९९ रुपयांचा हा फोन तुम्ही ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर ५ हजार रुपयांपर्यंत कूपन डिस्काउंट देखील मिळत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास ८ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. वाचा: दोन्ही ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनला फक्त ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय फोनवर ५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळतो. हा फोन ८ जीबी + १२८ जीबी आणि १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट्ससह येतो. 9 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन या फोनमध्ये ६.५ इंच फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज, रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. फोन ८ जीबी + १२८ जीबी आणि १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. यात स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मोनोक्रोम लेंस आहे. तर सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह यात ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. यासोबत १५ वॉट फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FXwPpI