Full Width(True/False)

Redmi Smartphone: ५०००mAh दमदार बॅटरीसह Redmi Note 11T 5G भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : इंडियाने आपला नवीन ५जी Redmi Note 11T 5G ला भारतात लाँच केले आहे. हा गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या Note 11 5G चे री-ब्रँडेड व्हर्जन आहे. मध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले, ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात पंचहोल डिस्प्ले मिळतो. भारतीय बाजारात हा फोन Realme 8s 5G, iQoo Z3 आणि Lava Agni 5G ला टक्कर देईल. वाचा: Redmi Note 11T 5G ची किंमत Redmi Note 11T 5G च्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आणि ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. Redmi Note 11T 5G ला ७ डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉन, Mi.com, Mi Home आणि रिटेल स्टोरवरून एक्वामरीन ब्लू, मॅट ब्लॅक आणि स्टारडस्ट व्हाइट रंगात खरेदी करू शकता. लाँचिंग ऑफर अंतर्गत आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन Redmi Note 11T 5G फोन अँड्राइड ११ आधारित MIUI १२.५ वर काम करतो. यात ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Mali-G५७ MC२ GPU, ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. यात ३ जीबीपर्यंत रॅम वाढवू शकता. Redmi Note 11T 5G चा कॅमेरा यात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल आणि दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. Redmi Note 11T 5G ची बॅटरी कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ४जी, LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v५.१, GPS/A-GPS, IR, USB टाइप-सी पोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि ३.५mm चा हेडफोन जॅक मिळतो. पॉवरसाठी ३३ वॉट प्रो फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी५ रेटिंग मिळाले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31e420U