मुंबई: 'चला हवा येऊ द्या'मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री नेहमीच चर्चेच असते. सोशल मीडिया अकाउंटवर ती तिचे अनेक फोटो शेअर करते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइल आणि खासगी आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली.आज तिचा वाढदिवस. श्रेयाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आजवरच्या प्रवासाबद्दल. शाळेपासूनच झाली सुरुवात'शाळेत असताना मी आणि माझी मोठी बहीण गंमत म्हणून घरात शाळेतल्या बाईंची नक्कल करायचो. शाळेत काय काय झालं हे आईला सांगतानाही आमच्या नकला सुरू असायच्या. मिमिक्री वगैरे कधीच डोक्यात नव्हतं. मिठीबाई कॉलेजमध्ये असताना पाचही वर्ष युथ, आयएनटी यासारख्या इंटरकॉलेज स्पर्धा केल्या. कॉलेजमध्ये लवकर येणं, रात्री उशिरापर्यंत एकांकिकांच्या तालमींसाठी थांबणं हे सगळं अनुभवलं. कॉलेज ते घर हा प्रवास मी ट्रेननं करायचे. त्यामुळे ट्रेनमध्ये पिना विकणारी बाई, गाणं गाणारे भिकारी, कॉलेजमध्ये येणाऱ्या हायफाय मुली, चहावाला अशा सगळ्यांचे आवाज, हावभाव याचं निरीक्षण सुरू करायचे. त्यामुळे जेव्हा मला मिमिक्री कर असं सांगण्यात आलं, तेव्हा या निरीक्षणाच्या सवयीचा मला खूप फायदा झाला. यातूनच मी साकारलेली अनुष्का शर्मा, स्पॅनिश बाई आणि इतर अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या', असं श्रेया सांगते. 'फू बाई फू'च्या निमित्तानं संधी मिळाली श्रेयाला अभिनयाची खरी संधी ही फू बाई फू'च्या निमित्तानं मिळाली. 'शाळेत असल्यापासून मी अभिनय करायचे. तेव्हा, आपण विनोदी कलाकार म्हणून कधी नावाजले जाऊ असं वाटलं नाही. उलट मी थोड्या गंभीर भूमिका करायचे. त्यामुळे माझ्या आईला वाटायचं की कधीतरी मला विनोदी भूमिका करायला मिळायला हवी. नंतर, 'फू बाई फू'च्या निमित्तानं मला ती संधी मिळाली. तेव्हा माझ्याबरोबर काम करणारे कलाकार म्हणजे एकापेक्षा एक विनोदवीर होते. त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करायची या जिद्दीनं मी काम करू लागले. माझ्या या सुरुवातीच्या प्रवासात मला भाऊ, कुशल, निलेश साबळे यांची मदत झाली',असं श्रेया म्हणते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3atU3FV