Full Width(True/False)

मंदार देवस्थळीला लक्ष्य करुन काही साध्य होणार नाही:अमेय खोपकर

मुंबई: मराठी मालिकाविश्वात सध्या मानधनाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. '' या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचे आरोप केले. त्यामुळ सिनेइंडस्ट्रीत चर्चेला उधाण आलं आहे. दोन दिवसांपासून हा मुद्दा गाजत असून नेते () यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी मालिकाविश्वाला या कठिण काळात एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे. 'करोनाकळात मनोरंजनविश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल मीडियावरुन त्याची जाहीर चर्चा करुन काही निष्पन्न होईल, याची शक्यता कमीच आहे. मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करुन काही साध्य होणार नाही. मंदारसारखेच इतरही बरेच टीव्ही निर्माते आर्थिक अडचणीत आहेत आणि त्याचा फटका कलाकार-तंत्रज्ञ सर्वांनाच बसतोय. करोनाचं संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेलं नाही. अशा या काळात सामंजस्याने वागून मध्यम मार्ग कसा काढता येईल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. लवकरच मराठी टीव्ही निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि चॅनल अधिकारी यांच्याबरोबर ‘झूम’ बैठक करण्याची योजना आहे. या परिस्थितीतून तोडगा काढता आला तर चांगलंच आहे, पण त्याहीपेक्षा एकत्र चर्चेनंतर गढूळ वातावरण जरी पूर्ववत झालं तरी पुरेसं आहे. करोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको. एकत्र येऊया आणि या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करुया',असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sjulv8