नवी दिल्लीः BSNL युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने १९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानवर अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देणे सुरू केले आहे. या प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला आता मुंबई, आणि दिल्लीच्या MTNL नेटवर्क सोबत देशात कुठेही ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. बीएसएनएलचा हा प्लान रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानला जोरदार टक्कर देत आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः BSNL चा १९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान BSNL च्या या प्लानमध्ये आता देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय कंपनी प्लानमध्ये युजर्संना १०० फ्री एसएमएस देत आहे. या प्लानमध्ये २५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ७५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर बेनिफिट सोबत येते. बीएसएनएलचा रिवाइज्ड प्लान १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला आहे. वाचाः जिओचा १९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान स्वस्त पोस्टपेड प्लानमध्ये जिओचा हा प्लान खूप प्रसिद्ध आहे. यात कंपनी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि फ्री एसएमएस ऑफर करते. प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा दिला जातो. युजर्स या प्लानमध्ये रोलओवर डेटा बेनिफिट कमी भासू शकते. प्लानच्या सब्सक्राईबर्सला कंपनी नवीन कॉम्प्लिमेंट्री बेनिफिट देत आहे. ज्यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि सावन सोबत अनलिमिटेड कॉलरट्यून्स बेनिफिटचा समावेश आहे. वाचाः दोन्ही प्लानमध्ये कोणता बेस्ट बीएसएनएल आपल्या प्लानमध्ये ७५ जीबी पर्यंत रोलओवर डेटा ऑफर करते. तर जिओ आपल्या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस आणि अनलिमिटेड कॉलरट्यून्स यासारखे बेनिफिट्स ऑफर करते. दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. जर तुम्हाल जास्त डेटाची गरज असेल तर बीएसएनएलचा १९९ रुपयांचा प्लान जास्त चांगला आहे. परंतु, २५ जीबी डेटा असल्याने रिलायन्स जिओचा प्लान सुद्धा चांगला आहे. यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oMtq46