Full Width(True/False)

SBI ची कोट्यवधी खातेधारकांना गुड न्यूज, नॉमिनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता ऑनलाइन

नवी दिल्लीः जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या खात्यामध्ये नॉमिनीचे रजिस्ट्रेशन केले नसेल तर एसबीआय बँकेने कोट्यवधी खातेधारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने आता नॉमिनी प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. याचाच अर्थ आता बँक खातेधारकांना आता या कामासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. वाचाः प्रत्येक खातेधारकांना मिळणार ही सुविधा ने ट्वीट करून आपल्या अकाउंट मध्ये नॉमिनी डिटेल्स () भरले नसेल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. हे काम आता तुम्ही घरबसल्या करू शकता. ही सुविधा एसबीआयच्या प्रत्येक ब्रँचमध्ये उपलब्ध आहे. ट्विटच्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे सेविंग किंवा करंट अकाउंट (SBI Saving Accounts) असेल तर तुम्ही घरात बसून नॉमिनी रजिस्टर करू शकता. वाचाः Netbanking द्वारे करा अपडेट नॉमिनी जर तुम्ही एसबीआयच्या नेट बँकिंगचा वापर करीत असाल तर एसबीआयची वेबसाइट onlinesbi.com. वर जाऊन भेट देऊ शकता. यानंतर रिक्वेस्ट अँड इन्कॉयरी पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावेळी अनेक पर्याय दिसतील. ज्यात ऑनलाइन नॉमिनेशनचा पर्याय निवडा. जर तुमचे एकापेक्षा जास्त अकाउंट असेल तर योग्य माहिती भरा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफिकेशन नंतर नॉमिनी नाव जोडले जाईल. वाचाः SBI अॅपवरून कसे कराल नॉमिनी अपडेट सर्वात आधी YONO LITE SBI अॅप वर लॉगिन करावे लागणार आहे. होम बटनावर क्लिक करून सर्विस रिक्वेस्ट पर्याय निवड करा. सर्विस रिक्वेस्ट वर क्लिक करून जे पेज उघडेल त्या ठिकाणी ऑनलाइन नॉमिनेशनचा पर्याय दिसेल. क्लिक केल्यानंतर अकाउंट डिटेल सिलेक्ट करावे लागेल. तसेच नॉमिनीची पूर्ण माहिती अपडेट करावी लागेल. नॉमिनीसोबत रिलेशनशीपची माहिती मागितली जाते. जर आधीच कोणी नॉमिनी असेल आणि त्याला अपडेट करायचे असेल तर आधीचे नॉमिनी रद्द करून सध्याच्या नॉमिनीची माहिती भरावी लागेल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tq6ACP