Full Width(True/False)

गुड न्यूज ! देशातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारचे मोबाइल App लाँच

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात Mera Ration नावाचे Mobile App लाँच केले आहे. ज्यात गरजू म्हणजेच गरीब कुटुंबाच्या लोकांना Fair Price Shop सोबत रेशन कार्ड मध्ये आपली सध्याच्या स्थिती आणि रेशन कार्डमधील सर्व माहिती मिळू शकणार आहे. ला Androd Smartphones साठी लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे युजर्स याला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. सध्या भारतात कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाइलवर सरकारी स्कीम आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते. वाचाः One Nation-One Ration Card च्या पावलावल पाऊल टाकत आता Mera Ration मोबाइल अॅप लाँच करण्यात आले आहे. रेशन कार्ड धारकांना जर आपले निवास स्थान बदलून नवीन ठिकाणी जात असेल तर ते मोबाइल अॅपवर पाहून शकतात. जवळ कोणते रेशन कार्ड आहे. त्या ठिकाणी कोणकोणती सुविधा दिली जात आहे. सरकारी डेटा नुसार, देशात ६९ कोटी लोक National Food Security Act (NFSA) चा फायदा लोक घेत आहेत. त्यांना सर्व लाभ मिळत आहे. वाचाः १४ भाषेत लवकरच होणार उपलब्ध National Food Security Act (NFSA) च्या डिटेल नुसार, या अॅक्टचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना Public Distribution System (PDS) द्वारे केवळ १ रुपये ते ३ रुपये प्रति किलोग्रॅम या प्रमाणे धान्य मिळते. ही सुविधा ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधील कोट्यवधी लोकांना मिळत आहे. आता माझे रेशन अॅप द्वारे याचा लोकांना फायदा होणार आहे. सध्या हे अॅप हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत दिले आहे. परंतु, लवकरच १४ भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाचाः असे करा डाउनलोड Mera Ration mobile appचा वापर सोपा आहे. सर्वात आधी हे अॅप डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला Central AEPDS Team) द्वारा डिवेलप केलेले अॅप मिळेल. डाउनलोड झाल्यानंतर आपला मोबाइल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्ड संबंधी सर्व माहिती मिळू शकेल. या अॅपवर गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळू शकेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38FnTqS