मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सध्या तिचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'सायना'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर दिलेल्या एका मुलाखतीत परिणितीनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला आलेला बॉडी शेमिंगचा अनुभव शेअर केला. परिणितीच्या वाढत्या वजनामुळे अनेकदा तिची कशाप्रकारे खिल्ली उडवली जायची हे तिनं यावेळी सांगितलं. या मुलाखतीमध्ये परिणिती म्हणाली, करिअरच्या सुरुवातीच्या काळात माझ्या वाढत्या वजनावरून माझी खिल्ली उडवली जात असे आणि मी त्यांच्याशी सहमत सुद्धा होते. कारण मी त्यावेळी चांगली दिसत नव्हते. मी माझ्या फिटनेससाठी योग्य ते प्रयत्न करत नव्हते. जर मी जे करू शकत होते ते सर्व करत असून, पूर्णपणे फिट असून किंवा चांगली दिसत असतानाही जर लोकांना माझा लुक आवडला नसता तर मला वाईट वाटलं असतं. पण मी त्यांच्याशी सहमत होते कारण मला माहीत होतं की मी पूर्ण प्रयत्न करत नाही आहे. बद्दल बोलताना परिणिती म्हणाली, 'या पृथ्वीवर बॉडी शेमिंग हे एक सर्वात वाईट गोष्ट आहे. हे असं आहे की, एखाद्याचे डोळे काळे आहेत तर त्यावरून त्या व्यक्तीला चिडवणं आणि त्रास देणं हे चुकीचं आहे.' परिणिती पुढे म्हणाली, 'फिटनेसवर लक्ष देणं आणि त्याबद्दल जागरुक असणं एक सामान्य गोष्ट आहे. पण समस्या याची आहे की, जेव्हा लोक तुमची तुलना मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या लोकांसोबत करतात. जेव्हा तुम्ही केवळ फिट असावी ही किमान अपेक्षा असते तेव्हा लोक तुमची तुलना करतात. जे लोक आपल्या जीवनात त्रासलेले असतात फक्त तेच लोक अशा गोष्टी करू शकतात.' काही काळापूर्वीच परिणितीचा चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' रिलीज झाला. हा चित्रपट ओटीटी प्लाटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. २०११ मध्ये रिलीज झालेल्या लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटातून परिणितीनं बॉलिवूड डेब्यू केला होता मात्र तिला खरी ओळख ही २०१२ मध्ये आलेल्या 'इश्कजादे'मधून मिळाली होती. आता अलिकडच्या काळात परिणितीचे 'द गर्ल ऑन द ट्रेन', 'संदीप और पिंकी फरार' आणि 'सायना' असे सलग ३ चित्रपटा रिलीज झाले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ru7xbg