मुंबई- बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या कपड्यांच्या स्टाइलसाठीही ओळखले जातात. आपल्या आवडत्या कलाकारासारखं दिसणं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु, अनेकदा अभिनेत्रींनाही सगळ्यांसमोर उप्स मुमेंटचं शिकार व्हावं लागतं. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला देखील अशाच एका ओप्स मुमेंटचा सामना करावा लागला आहे. 'बिग बॉस १४' मधून बाहेर आल्यापासून राखी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती जिमबाहेर नेहमी पत्रकारांशी बोलताना दिसते. नुकत्याच एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान तिलादेखील अशाच घटनेचा सामना करावा लागला आहे. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान ती डिझायनर्सवर रागावलेली दिसतेय. राखीच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात राखी एक गुलाबी रंगाचा लेहेंगा चोळी घालून उभी असल्याचं दिसतंय. त्यात ती कपड्यांची तक्रार करताना म्हणते, 'आता तर एक झटका पण दिला नाही आणि हे ब्लाउज फाटलं. कशी नाडी लावली आहे. आता काय करू? आता सेफ्टीपिन लावून नाचू का? आम्ही कलाकार जेव्हा मंचावर जातो तेव्हा आम्ही आमच्याकडून १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो. पण हे असं घडलं तर ते कसं होणार? मग प्रेक्षक म्हणतात आम्ही नखरे करतो. आम्ही मुद्दाम आमचं ब्लाउज फाडू का? माझी टीम माझी वाट बघतेय. हे असं सगळं घडतं कलाकारांसोबत .' तर दुसरीकडे राखीच्या मागे एक महिला हातात सुई- दोरा घेऊन तुटलेली नाडी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतेय. राखी या घटनेमुळे प्रचंड रागावली आहे. त्यामुळे सगळेच तिला घाबरलेले दिसतायत. हे चित्रीकरण राखीच्या होळी स्पेशल गाण्यासाठी सुरु होतं. ज्यात ती अभिनेत्री मोनालिसासोबत नृत्य करताना दिसतेय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fkHPmZ