Full Width(True/False)

सारा अली खान पोहोचली सैफच्या चहाच्या दुकानावर, शेअर केला फोटो

मुंबई- बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यासोबत ती तिचे नृत्याचे व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून देखील भरपूर प्रतिसाद मिळत असतो. नुकताच साराने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. फोटो पाहून लोकांना तिच्यावर हसावं की काय करावं असा प्रश्न पडला आहे. अनेकांनी त्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या. या फोटोत साराने तिच्या वडिलांसाठीच म्हणजे साठीच प्रेम व्यक्त केलंय. सारा तिच्या फिटनेसबाबत किती सजग आहे हे साऱ्यांनाच माहीत आहे. पण तरीही ती एखादा दिवस बाहेरच्या खाण्यावर ताव मारण्यासाठी काढते. यातही तिला टपरीवरचा चहा प्यायला प्रचंड आवडतो. साराने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका चहाच्या टपरीसमोर बसलेला फोटो शेअर केला. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. महत्वाचं म्हणजे या चहाच्या टपरीचं नाव 'सैफ चाय वाला' असं आहे. हा फोटो शेअर करताना साराने 'आय लव्ह माय डॅड.' असं कॅप्शनही दिलं. सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. साराच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर तिने अक्षय कुमार आणि धनुष सोबत 'अतरंगी रे' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. साराने त्याबद्दलची एक पोस्टदेखील शेअर केली होती. यात तिने चित्रपटातील सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर टीमचे देखील आभार मानले होते. यापूर्वी ती वरुण धवनसोबत 'कुली नं. १' मध्ये दिसली होती. लवकरच ती 'अतरंगी रे' मध्ये झळकणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31sjOCl