Full Width(True/False)

Video: जेव्हा सुशांतनं अंकिता-जॅकलीनसोबत केलं होतं सेलिब्रेशन

मुंबई: बॉलिवूडमध्ये नेहमीच होळीचं जोरदार सेलिब्रेशन होताना दिसतं. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या होळीच्या पार्टींमध्ये अनेक सेलिब्रेटी धम्माल करताना दिसतात. मागच्या वर्षीपासून करोना व्हायरसमुळे बॉलिवूडमध्ये कोणत्याही प्रकारची होळी पार्टी झालेली नाही. मात्र काही जुन्या होळी पार्ट्यांमधील फोटो मात्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात तो एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत धम्माल डान्स करताना दिसत आहे. सुशांतसिंह राजपूतचा हे व्हिडीओ त्याच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. ज्यातील जॅकलीनसोबतचा त्याचा व्हिडीओ २०१६ मधील आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूडच्या एका होळी पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'सिलसिला' चित्रपटातील 'रंग बरसे' या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे. ज्यात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सुद्धा धम्माल करताना दिसत आहे. सुशांतच्या फॅनपेजवर आणखी एक व्हिडीओ आणि कोलाज फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात तो एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसोबत होळी सेलिब्रेशन करताना दिसत आहे. सुशांत आणि अंकिता यांनी एकत्र पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेत काम केलं होतं आणि या मालिकेच्या सेटवर झालेली त्यांची मैत्री प्रेमात बदलली. जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघंही वेगळे झाले होते. या दरम्यान ते काही वर्ष लिव्ह-इनमध्ये सुद्धा राहत होते. सुशांतसिंह राजपूतनं मागच्या वर्षी १४ जूनला मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. सध्या सीबीआय याबाबत अधिक तपास करत आहे. या वर्षी झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुशांतच्या छिछोरे चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा त्याच्या निधनानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. ज्यात त्याच्यासोबत अभिनेत्री संजना सांघी मुख्य भूमिकेत दिसली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39pHsnn