मुंबई- राज्यभरात करोनाचा प्रसार वाढताना दिसतोय. अनेक राज्यांनी लॉकडाउनदेखील घोषित केला आहे. त्यात आता महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने सरकारने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. बॉलिवूडवरदेखील याचा परिणाम दिसू लागलाय. बॉलिवूडवरच करोनाचं संकट वाढताना दिसतंय. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता आणखी एका अभिनेत्रीला करोनाची लागण झाल्याचं कळतंय. बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत '' चित्रपटात काम करणारी अभिनेत्री हिलादेखील करोनाची लागण झाली आहे. फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माहिती देत याबद्दल सांगितलं. सध्या तिला तिच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तिने एक पोस्ट करत लिहिलं, 'मी करोना चाचणी केली होती. ती आता पॉसिटीव्ह आली आहे. मी सरकारने दिलेल्या सर्व निर्बंधांचं पालन करत आहे आणि सध्या माझ्या राहत्या घरात क्वारंटाइन आहे. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि प्रार्थनांबद्दल खूप धन्यवाद. सुरक्षित राहा, मित्रांनो.' या वर्षाच्या सुरुवातीला फातिमा अभिनेते यांच्यासोबत एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानला गेली होती. या चित्रपटाबद्दल फार माहिती देण्यात आलेली नाही. या चित्रपटाच्या सेटवर फातिमाने तिचा जन्मदिवसही साजरा केला होता. दुसरीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार करोनाचे शिकार होत आहेत. त्यात आमीर खान, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर यांना कोरोना झाला आहे. तर सैफ अली खान, सलमान खान आणि संजय दत्त सारख्या अभिनेत्यांनी कोविड- १९ लस घेतली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u929f4