Full Width(True/False)

...म्हणून महेश भट्ट यांना आलियाचं लग्नचं होऊ नये असं वाटतं

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. एकीकडे तिच्या आगमी चित्रपटाचं शूटिंग एका मागोमाग एक सुरू आहे तर दुसरीकडे रणबीर कपूरसोबतचं तिचं नातं सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. रणबीर आणि आलिया एकमेकांना मागच्या काही वर्षांपासून डेट करत असून लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहे. पण आलिया भट्टच्या लग्नाला तिचे वडील यांचा विरोध आहे. आलियानं एवढ्या लवकर लग्न करावं असं महेश भट्ट यांना अजिबात वाटत नाही. महेश भट्ट यांचं आपल्या मुलींवर खूप प्रेम आहे आणि ते त्यांच्या बाबतीत जरा जास्तच इमोशनल आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलींनी लग्न करून त्यांच्यापासून दूर जावं असं त्यांना अजिबात वाटत नाही. यााचा खुलासा आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. आलिया म्हणाली, 'माझे बाबा आमची खूप काळजी करतात. त्यांच्या हातात असेल तर ते माझं लग्नही होऊ देणार नाहीत.' घरात लग्नाचा विषय आला तर बाबा कशाप्रकारे धमकी देतात याबद्दलही आलियानं या मुलाखतीत सांगितलं. आलिया पुढे म्हणाली, 'घरात जेव्हा लग्नाचा विषय निघतो तेव्हा ते मला बाथरुममध्ये बंद करण्याची धमकी देतात. ते म्हणतात मी तुला बाथरुममध्ये बंद करून ठेवेन पण तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. त्यांना भीती वाटते की लग्नानंतर मी त्यांच्यापासून खूप दूर निघून जाईन.' दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं आपल्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना वेळ देताना दिसतात. त्यामुळे लवकरच हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तिच्याकडे एस एस राजामौली यांचा 'RRR' हा चित्रपट आहे. या व्यतिरिक्त मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात आलिया भट्ट अभिनेता रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QipaO8