Full Width(True/False)

राणी मुखर्जीच्या 'या' जबरदस्त वक्त्यव्यांमुळे ती बनली बॉलिवूडची 'मर्दानी'

मुंबई- ९० च्या दशकात आपल्या रोमँटिक अंदाजाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री राणी मुखर्जीचाआज वाढदिवस. तिने अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची भुरळ पाडली. राणी प्रत्येक गोष्टीवर तिचं मत अगदी स्पष्टपणे मांडत आली आहे. बॉलिवूडमध्येही तिने अनेक गोष्टींवर तिचं मत मांडलं होतं ज्यामुळे तिला बॉलिवूडच्या मर्दानीची ओळख मिळाली. आज २१ मार्च तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेउया तिच्या या वक्तव्यांबद्दल. लग्नानंतरच्या आपल्या करियरबद्दल पत्रकारांसोबत बोलत असताना राणीने त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अत्यंत स्पष्टपणे म्हटलं होतं की, 'मी माझ्या कामातून प्रत्येकाला उत्तर देईल. मी इतर कुणाचं का ऐकू? बॉलिवूड इण्डस्ट्रीचा भाग असल्याने मला माहितीये की लोक किती आणि काय काय बोलतात. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्र्या लग्नानंतर सगळं सोडून देतात. हे सगळं फक्त त्यांच्या डोक्यात असतं.' राणीने आणखी एका मुद्यावर तिचे विचार मांडले होते. जेव्हा तिला सांगण्यात आलं की बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी काम किंवा कुटुंब यातील एकाची निवड करावी लागते. त्यावर राणीने म्हटलं होतं की, 'हे कुणी ठरवलं? सगळं तुम्ही ठरवून मोकळे होता. ज्यांच्या आयुष्याबद्दल तुम्ही बोलता त्यांना या बाबतीत निर्णय घेऊ द्या. त्यांना दोन्ही करायचं असेल तर? आता बॉलिवूडमध्ये अभिनेत्री कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळतात.' राणीने कधीही स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला नाही. तिने सैफ अली खानला देखील नात्याबद्दल सल्ला दिला होता. सैफने स्वतः या गोष्टीची माहिती दिली होती. जेव्हा सैफ करीनाला डेट करत होता तेव्हा राणीने त्याला सांगितलं होतं की, 'तू एका पुरुषाला डेट करतोयस असं समज.' म्हणजेच घरात आता कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील. कुणीही मोठं नाही आणि कुणीही छोटं नाही, असं राणीने सैफला समजावलं होतं. राणीने अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या मते चित्रपटात हे महत्वाचं नसतं की मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे. तर हे महत्वाचं असतं की कोणतं पात्र जास्त चांगलं आहे. कोणती भूमिका जास्त महत्वाची आहे. राणीच्या मते आताच्या स्त्रियांना स्वतःच्या संरक्षणासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःसाठी लढलं पाहिजे त्यांनी स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे. त्यांनी स्वतःच्या भीतीशी लढलं पाहिजे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lChWA0